case file agaist rutuja latake | निवडणूकीत ठाकरे गटाकडून लढणाऱ्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा निवडणूक अर्ज भरण्यास अडचणी येत आहे. ऋतुजा लटके या महापालिकेत लिपीक म्हणून कार्यरत होत्या. पण त्यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता. असे असले तरी त्यांचा राजीनामा अजून स्वीकारण्यात आलेला नाही.
त्यामुळे ऋतुजा लटके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी सुद्धा आज पार पडली आहे. पण यावेळी पालिकेने खळबळजनक खुलासा केला आहे. लटके यांच्याविरोधात लाच घेणे आणि भ्रष्टाचारप्रकरणी १२ ऑक्टोबरला एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा प्रलंबित ठेवण्यात आला असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारणार की नाही? असे विचारले होते. त्यावेळी पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी एक अजब दावा केला आहे. ऋतुजा लटके यांच्याविरोधात १२ ऑक्टोबर रोजी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. ती तक्रार भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आहे. त्यामुळे हा राजीनामा प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
हा ठाकरे गट आणि ऋतुजा लटके यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लटके या निवडणूकीत उतरणार की नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोटनिवडणूकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
सध्याची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा वाद आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्याची आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांना उद्या कोणत्याही परिस्थितीत अर्ज दाखल करावा लागणार आहे.
दरम्यान, चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेतले आहे. तसेच त्यांनी आपले चिन्ह मशाल असे घेतले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव घेतले आहे. तसेच त्यांचे चिन्ह हे ढाल आणि तलवार असे आहे.
महत्वाच्या बातम्या-
kirit somaiya : मुंबई विद्यापीठाची कमाल! किरीट सोमय्यांच्या मुलाला अवघ्या १४ महिन्यांत दिली PhD पदवी
Sonia Gandhi: ‘हा’ नेता आहे सोनिया गांधींचे ATM; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ
Eknath shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका; कोट्यवधींची कामं केली रद्द, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण