भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक; हॉटेलमध्ये नेणाऱ्या बसमध्ये सापडली ‘ही’ भयानक गोष्ट

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ३ सामन्यांच्या टी २० मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीतील पीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. (cartridges shell found in india cricket team bus)

भारतीय कसोटी संघाचे खेळाडू चंदीगडला पोहोचले आहेत. टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेतही श्रीलंकेला पराभूत करण्यासाठी खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. मात्र याच दरम्यान भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

चंदीगड येथील हॉटेलमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी भारतीय कसोटी संघाचे खेळाडू स्टेडियममध्ये सराव करण्यासाठी हॉटेलमधून निघणार होते. खेळाडूंना हॉटेलपासून स्टेडियमपर्यंत बसमध्ये घेऊन जावे लागणार होते, त्यासाठी एक बस होती.

खेळाडू बसमध्ये चढण्यापूर्वी बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बसमध्ये २ काडतुसाचे दोन खोके सापडले असून ती आता जप्त करण्यात आली आहेत. ते ३२ बोअर पिस्तुलाचे आहे. खेळाडूंना येण्याजाण्यासाठी तारा ब्रदर्सची ही बस आयटी पार्कमधील हॉटेल ललितच्या बाहेर उभी होती.

या घटनेनंतर खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रियांक पांचाळ, उमेश यादव, जयंत यादव, सौरभ कुमार आणि केएस भरत हे खेळाडू बसमध्ये चढणार होते. हे सर्व खेळाडू हॉटेल ललितमध्ये थांबले आहेत.

विराट कोहली आणि ऋषभ पंतही शनिवारी सुट्टी संपवून संघात दाखल झाले आहेत. काडतुसे सापडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह कारवाई केली. पोलिसांनी बसमध्ये सापडलेली काडतुसे जप्त करून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, टी २० मालिकानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल, हा सामना ४ ते ८ मार्च दरम्यान खेळवला जाईल. टी २० मालिकेतील शेवटचा सामनाही याच मैदानावर होणार आहे.

त्यानंतर, दोन्ही संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बंगळुरूला रवाना होतील जिथे दुसरा कसोटी सामना खेळला जाईल. या कसोटी मालिकेत रोहित शर्मा पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘पुणे-मुंबईची भाषा ही महाराष्ट्राची भाषा नाही’, नागराज मंजुळे असं का म्हणाले?
VIDEO: सामना सुरु असतानाच इशान किशनला करावं लागलं रुग्णालयात दाखल; पहा नक्की काय घडलं
‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘रायाजी’ अर्थात अंकित मोहनची बायको आहे ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री