सध्याच्या काळात गुगल अतिशय महत्वाचे आहे. गुगल हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही. तुम्ही गुगलवर कोणतीही माहिती मिळवू शकता. गुगल हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.
गुगल सर्चवर जाऊन तुम्ही कोणताही प्रश्न विचारला असता, त्याचे तुम्हाला एका झटक्यात उत्तर मिळते. एकप्रकारे एका चांगल्या वेगाने गुगल आपल्याला ही माहिती देते. पण, तुम्हांला माहिती आहे का काही गोष्टी गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हांला सरळ जेलची हवा खावी लागेल.
होय, हे खरे आहे, गुगलवर तुम्ही ‘या’ चार गोष्टी सर्च करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागेल. आता नेमक्या या चार गोष्टी आहेत तरी कोणत्या असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देतो, ज्यामुळे तुम्ही सावध व्हाल.
तुम्ही गुगल वरती बॉम्ब कसे बनवायचे हे सर्च करणार असाल तर सावध. अनेक वेळा लोक गंमतीने गुगलवर बॉम्ब बनवण्यासारखे संवेदनशील विषय शोधतात अशावेळी जर तुम्ही सर्च करताना आढळलात तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते कारण हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असते.
तसेच जर तुम्ही गुगलवर दहशतवादी कारवायांशी संबंधित व्हिडिओ आणि कंटेंट सर्च केले तर तुम्हाला तुरुंगात जावे लागण्याची शक्यता आहे. सरकार नेहमीच अशा सर्चवर लक्ष ठेवते आणि जर एखाद्या व्यक्तीने या गोष्टी गुगलवर सर्च केलेच तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते.
तुम्ही भारतातील बंदी असलेल्या ठिकाणांची माहिती गोळा करण्याचा सतत प्रयत्न करत असाल, तर तुमच्यावर काही कायदेशीर कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक सरकार अशा शोधांवर लक्ष ठेवते. त्यामुळे तुम्ही अशा बंदी असणाऱ्या ठिकाणांची माहिती गुगलवर सर्च करू नका.
चौथी गोष्ट म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफी बाबत तुम्ही गुगल वरती सर्च करू शकत नाहीत. चाइल्ड पोर्नोग्राफी ही खूप गंभीर समस्या आहे, ज्याबद्दल तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. आयटी कायद्यात अशा सर्चवर पूर्ण बंदी आहे आणि अशा परिस्थितीत जर तुम्हीही असा कोणताही कनटेंट सर्च केला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.