car accident on samruddhi mahamarg | गेल्या काही वर्षांपासून राज्यातील समृद्धी महामार्गाची चर्चा होत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
या महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच एक अपघात झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. टोलनाक्यावर आलेल्या एका कारने पुढे असलेल्या कारला धडक दिली आहे. त्यामुळे हा अपघात झाला आहे. पण या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याठिकाणी लोकार्पण केले त्याच्या जवळच्या ठिकाणीच हा अपघात झाला आहे. तसेच या अपघातात कोणी जखमीही झाले नाहीये. दोन्ही कारचालकांनी आपल्या सामंजस्याने त्याठिकाणीच समोपचाराचा तोडगा काढला. त्यामुळे पोलिसांनाही यामध्ये तक्रार दाखल करण्याची गरज पडली नाही.
समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. हा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी असा आहे. रविवारी नरेंद्र मोदींनी याचे लोकार्पण केले. या रस्त्यामुळे इंधन आणि वेळ अशा दोन्ही गोष्टी वाचणार आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी अनेकजण या मार्गावरुन जाण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे काही लोक शिर्डीच्या दिशेने निघाले होते.
अशात समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंटवरच हा अपघात झाला. कारचालक हा खुप वेगाने कार चालवत होता. अशात अचानक एक कार समोर आली. त्यामुळे त्याने ब्रेक दाबला पण ब्रेक दाबायला उशीर झाल्यामुळे कार समोरच्या कारला धडकली यावेळी कोणीही जखमी झाले नाही.
अशात तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. पण दोन्ही कार चालकांनी ते प्रकरण त्यांच्यातच मिटवून घेतले. हिंगणा पोलिस स्टेशनला याबाबतची माहिती मिळाली होती. पण तक्रार नसल्यामुळे त्यांनी कारवाई केली नाही. पण स्टेशन डायरित याची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
हार्दीक पांड्याची जागा घेण्यासाठी ‘हा’ मराठमोळा खेळाडू सज्ज; एकट्याच्या बळावर संघाला जिंकवतोय
भारतीय क्रिकेटविश्वावर शोककळा! २५ वर्षीय युवा क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू
Chandrakant Patil : भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, पण आता तरी…; चंद्रकांत पाटलांचं सपशेल लोटांगन