भाजप खासदार आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराट कोहलीचे कर्णधारपद सोडण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कर्णधारपद हा कोणाचाही जन्मसिद्ध हक्क नाही, विराटचे लक्ष आता फक्त धावा करण्यावर असले पाहिजे. असे म्हणत विराटला गौतम गंभीरने खडेबोल सुनावले आहेत.
गौतम गंभीरला, कर्णधारपद सोडल्यानंतर आपण आता नवीन विराटला पाहणार आहोत का?असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर गंभीर म्हणाला, तुम्हांला नवीन काय बघायचे आहे? कर्णधारपदाचा जन्मजात अधिकार कोणालाही नाही. महेंद्रसिंग धोनीनेही विराट कोहलीला कर्णधारपद सोपवले. नंतर तो कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. वास्तवात, धोनीने तीन आयसीसी ट्रॉफी आणि 4 आयपीएल विजेतेपदे जिंकलेली आहेत तरीदेखील.
गौतम गंभीर पुढे म्हणाला, विराट कोहलीचे पूर्ण लक्ष आता जास्तीत जास्त धावा करण्यावर असले पाहिजे. जेव्हा तुम्ही भारताकडून खेळण्याचे स्वप्न पाहता, तेव्हा तुम्ही कर्णधार होण्याचे स्वप्न पाहत नाही. तुम्ही भारतासाठी सामने जिंकण्याचे स्वप्न पाहता. फक्त बदल हा आहे की, नाणेफेकीला जाता येत नाही आणि फील्ड प्लेसमेंट करता नाहीत.
तसेच विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत गौतम गंभीर म्हणाला, खेळाडूने मैदानात तेवढयाच ऊर्जेने उतरले पाहिजे, मग तो खेळाडू म्हणून मैदानावर उतरला असेल किंवा कर्णधार म्हणून उतरला असेल. कारण तुम्ही नेहमीच देशासाठी खेळता, ही तुमच्यासाठी अभिमानाची बाब असली पाहिजे.
दरम्यान,विराट कोहलीने 15 जानेवारीला अचानक सोशल मीडिया पोस्ट लिहून कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेटविश्वात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वाधिक ४० सामने जिंकले. जर आपण जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधाराबद्दल बोललो तर त्यातही विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.
महेंद्रसिंग धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर 2014 मध्ये विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी 7 वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा संघ बनला. तर संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरीही गाठली.
महत्वाच्या बातम्या
साऊथमधली आणखी एक जोडी तुटली, नागाचैतन्य पाठोपाठ धनुषनेही घेतला घटस्फोट
मोठी बातमी! अभिनेता धनुषने रजनीकांतच्या मुलीला दिला घटस्फोट; म्हणाला, इथून पुढे आपले रस्ते..
कोण आहेत मनोज परब ज्यांना लोक गोव्याचे राज ठाकरे म्हणत आहेत? वाचा त्यांच्याबद्दल..