Share

Rohit Sharma : उपांत्य फेरीआधीच टिम इंडीयाला मोठा धक्का, संघाचा आधार असलेला ‘हा’ मुख्य फलंदाज जखमी

indian team

captain rohit sharma injured | भारतीय संघ सध्या टी २० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. दोन दिवसांनी म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध सेमी फायनलचा सामना खेळणार आहे.

अशातच भारतीय संघाला सेमी फायनल सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला आहे. सरावादरम्यान, हिटमॅन रोहित शर्माच्या मनगटाची दुखापत झाली आहे. सरावादरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजी करताना मनगटाची दुखापत झाली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटावर दुखापत झाली आहे. मात्र, आता रोहित शर्माने पुन्हा सराव सुरू केला आहे.

कर्णधार रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, याचा अंदाज बांधता येणार नाही. मनगटाच्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्माने लगेचच फलंदाजीचा सराव थांबवला. त्यानंतर लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आले आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कर्णधार रोहित शर्माची ही दुखापत फारशी गंभीर नसावी, अशी प्रार्थना भारतीय क्रिकेट चाहते करत आहे. नाहीतर इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाच्या अनेक स्टार खेळाडूंना दुखापत झाली असून त्यांना संघाबाहेर बसावे लागत आहे.

दरम्यान, रोहित शर्माची दुखापत गंभीर असेल तर टीम इंडियासाठी हा सर्वात मोठा झटका ठरेल, कारण तो भारतीय संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे. पण त्याची ती दुखापत गंभीर नसल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे तो सेमी फायनलचा सामना खेळण्याची शक्यता जास्त आहे.

महत्वाच्या बातम्या-
हातात तिरंगा आणि डोळ्यात अश्रू… थेट मैदानात आलेल्या चाहत्यासोबत रोहीतने केले असे काही की जिंकले सर्वांचे मन
Bull : शांत उभ्या असलेल्या बैलाची वृद्धाने विनाकारण काठीने काढली खोड, नंतर जे घडलं ते पाहून लोटपोट हसाल
टेनिस बॉल क्रिकेट खेळून टिम इंडीयाचा स्टार बनलाय ‘हा’ क्रिकेटर, वर्ल्डकपमध्ये घालतोय धुमाकूळ

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now