Share

गांजा विकत होता गोव्यात, सुगावा लागला महाराष्ट्रातून; पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या

smoke

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. यापूर्वी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजस्थानमधील बाळाराम, असे या आरोपीचे नाव आहे.(Cannabis was being sold in Goa)

बाळाराम याला शुक्रवारी सायंकाळी १० किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शिरपूर येथून त्याचा माग काढल्यानंतर म्हापसा येथे छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी तो सापडला आहे.

गोव्यात रिसिव्हरची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याबरोबरच त्याला पकडण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वी बाळारामला NCB ने अटक केली होती.

ही अटक ६ फेब्रुवारी रोजी एका प्रकरणात केली होती. ३.५ किलो गांजासह बाळारामला अटक करण्यात आली होती. दरम्यान २५ फेब्रुवारी रोजी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

अंमली पदार्थांचा व्यवहार आता केवळ किनारपट्टी भागापुरता मर्यादित न राहता तो शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पोचला आहे. फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांत सातपेक्षा जास्त छापे टाकण्यात आले आहेत.

या छाप्यांमधून गांजा व इतर प्रकारचे अंमलीपदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता फक्त किनारपट्टी भागातच नव्हे तर शहर आणि ग्रामीण भागातही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कडक तपासणी सुरु केली आहे.

महत्वाच्या बातम्या
कामावर रजा टाकून व्यापाऱ्याकडून लुटले ४५ लाख, पुणे पोलिसांचा कारनामा, तिघांना अटक
”फडणविसांना हात लावला तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीलाही जाळून टाकू”

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now