Share

Canada: हृदयद्रावक: आपल्या तीन मुलांची दृष्टी जाणार हे समजल्यानंतर आई- वडिलांनी जे केलं ते वाचून तुम्ही ढसाढसा रडालं

Untitled design

कॅनडा(Canada): आपला जन्म होण्याच्या आधीपासून आपल्यावर प्रेम करतात ते म्हणजे फक्त आई वडील. आपण नेमकं कसं आहोत हे सुद्धा त्यांना माहित नसतं, तरीही ते आपल्यावर जीवापाड प्रेम करतात. आईचे प्रेम हे बाकीच्यांपेक्षा ९ महिने जास्त असतं. आई वडिलांच्या प्रेमावर आपण कधीही संशय घेऊ शकत नाही. आई काय असते तर लंगड्याचा पाय असते, आंधळ्याचा डोळा असते, याच कवितेचा सार कॅनडामधील एका आईने आपल्या वास्तविक जीवनात उतरवला आहे.

कॅनडामधील एक जोडपं जगभ्रमंतीसाठी निघालेलं आहे. आता तुम्ही विचार कराल की, यात काय नवल सगळेच एन्जॉय करतात. पण तसे नाही, यामागचे कारण ऐकून तुमचे डोळे पाणावतील. या जोडप्याला चार मुले आहेत. त्यापैकी तीन मुलांना एका आजाराने घेरले आहे. त्यांना अनुवांशिक असणारा डोळ्यांचा दुर्धर आजार झाला आहे.

हळहळू या मुलांच्या डोळ्यांची दृष्टी कमी होत चालली आहे. इतके दुःख सहन करत असताना ते आई वडील हार मानून रडत बसले नाही. त्यांनी ठरवले की, आपल्या मुलांकडून जेवढं जग पाहणं होईल तेवढं त्यांना दाखवायचं. त्यासाठी ते जगभ्रमंतीसाठी निघाले आहेत. यावरून आपण विचार करू शकतो की, आई वडिलांच्या मायेइतकं उदार काहीच नसतं.

आयुष्यात कितीही कमी असू द्या, तरीही मुलांची स्वप्न पूर्ण करायला आई वडील आपल्या जीवाची बाजी लावतात. मुलं ही आईवडिलांचाच एक अंश असतात. मुलांच्या सुखासाठी आई वडील काहीही करू शकतात. नुकतीच घडलेली यवतमाळ येथील एक घटना आहे. मुलीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने तिची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती.

त्यामुळे मुलीला नागपूर येथील मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. मुलीची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तिला व्हेन्टिलेटरची आवश्यकता होती. परंतु रुग्णालयात ते उपलब्ध नव्हते त्यामुळे आई वडिलांनी ॲम्बुबॅग दाबून दाबून मुलीला कृत्रिम श्वास पुरवला. तिला श्वास पुरवता पुरवता त्यांच्यावर जीव सोडण्याची पाळी आली होती.

इतके प्रयत्न करूनही त्यांच्या मुलीचा जीव वाचला नाही. यावरून लक्षात येतं की, मुलांच्या जिवापेक्षा आई वडिलांसाठी काहीही महत्वाचं नसतं, अगदी स्वतःचा जीवही नाही. त्याचप्रमाणे कॅनडातील हे जोडपंही आपल्या मुलांच्या सुखाचा विचार करून जगभ्रमंती करीत आहे. त्यांना हेच वाटत की, आहे तो पर्यंत माझ्या मुलांनी संपूर्ण जग स्वतः च्या डोळ्यांनी पाहावं.

महत्वाच्या बातम्या
Cheetah : २५० दरोडे आणि ७० खून करणारा डाकू बनला ’चित्ता मित्र’; उचलला चित्त्यांच्या सुरक्षेचा विडा
Narendra Modi : “पंतप्रधान मोदींना त्यांचे मित्र गौतम अदानींना जगात पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनवायचे आहे”
Sharad pawar : पवारसाहेब देशाला घडविणारा नेता; राणेंना भाजपच्याच नेत्याने तोंडावर आपटवले
Mumbai : आघाडीत बिघाडी! अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत काॅंग्रेस शिवसेने विरोधात उमेदवार उतरवणार

ताज्या बातम्या आरोग्य इतर

Join WhatsApp

Join Now