आपल्याकडे असे काही आजार आहेत त्याने व्यक्तीचा मृत्यू हा अटळ असतो, असे बोलले जाते. त्यातीलच एक आजार म्हणजे कॅन्सर आतापर्यंत अनेकांचा या आजाराशी लढताना जीव गेला आहे. अलीकडे कॅन्सर होण्याचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
समजा एखाद्याला कॅन्सर आहे आणि तो फक्त ६ ते ८ महिने जगू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं तर त्या व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबियांना किती धक्का बसेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. असच डॉक्टरांनी एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला सांगितले.
मात्र त्याने खचून न जाता असे काही केले की, डॉक्टरदेखील ते पाहून हैराण झाले. हि घटना आहे इंग्लंडमधील. 2014मध्ये पाब्लो केली(Pablo Kelly) या नावाच्या व्यक्तीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्रास जाणवू लागल्याने पाब्लो यांनी डायग्नोसिस केले तेव्हा कॅन्सर असल्याचं कळालं. त्यांना जबर धक्का बसला.
कॅन्सर रिपोर्ट आल्यानंतर रेडियोलॉजी उपचार सुरू झाल्यावर तयांची दाढी आणि डोक्यावरील केस काढले. त्यानंतर ऑन्कोलॉजिस्टसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की, जरी उपचार झाले तरी १२-१३ महिने जीवित राहू शकतो आणि उपचार नाही केले तर ६-८ महिन्यात मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मात्र पाब्लो हे कॅन्सर सोबत लढण्यास तयार झाले न खचता त्यांनी मानसिक तयारी केली. त्यांनी स्पेशल किटो डाइट निवडला. जेवणात बदल केला. कार्बोहाइड्रेट नसणारे जेवण खाल्लं. त्यामुळे त्याच्या ट्यूमरचा आकार लहान झाला. याबाबत बोलताना किटो डाइट प्लॅनमुळे त्याच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचा दावा पाब्लो यांनी केला आहे.
दरम्यान, पाब्लो यांच्यात झालेली सुधारणा पाहून डॉक्टरही हैराण झाले आहे. आजही ते टर्मिनल ब्रेन कॅन्सरनं पीडित आहेत. आज ८ वर्ष झाल्यानंतरही ते जिवंत आहे. तसेच तू खूप भाग्यवान आहेस असं डॉक्टर पाब्लो यांना म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात किटो डाइट प्लॅन फिटनेस इन्फुएंसर्सने लोकप्रिय केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
फॅन, कुलर, फ्रीज आताच खरेदी करा, महिन्याभरात इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमतीत होणार ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ
वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार; रिक्षा चालकाला विनाहेल्मेटचा दंड, दंड न भरल्याने कोर्टाकडून समन्स
‘दोन पिच्चरमध्ये मराठी सिनेमाला कुठल्या कुठं नेलंस तू भावा’, किरण मानेंनी केले तोंडभरून कौतुक
PHOTO: ऐश्वर्याची बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री; ५०० कोटी बजेट असलेल्या ‘या’ चित्रपटातील फर्स्ट लूक झाला रिलीज