Share

eknath khadse : अमित शाहांच्या भेटीसाठी खडसे सासरे-सून दिल्लीला; घरवापसीच्या चर्चाना आलं उधाण

raksha khadse

eknath khadse : राजकीय वातावरण झालेलं असतानाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात फोन वरून संवाद झाल्याची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. शाहांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेट झाली नसल्याची माहिती रक्षा खडसेंनी दिली. असं असलं तरी देखील, अमित शाहांची फोनवर चर्चा झाल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे.

या सर्व घडामोडींमुळे आता पुन्हा एकनाथ खडसे घरवापसी करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत भाषण करताना एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली असल्याचा दावा केला होता.

यामुळे तर आणखीनच खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चाना वेग आला आहे. याबाबत पत्रकारांनी रक्षा खडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, स्पष्ट उत्तर देणे टाळले. ‘मला काही माहित नाही, मात्र आता तरी मी भाजपात व नाथाभाऊ राष्ट्रवादी असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, यामुळे आगामी काळात खडसे यांची राजकीय भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह यांच्याशी नेमकी कोणती चर्चा झाली? हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये. मात्र येणाऱ्या काळात खडसे यांच्या वक्तव्यवरून लक्षात येईल की खडसे पुन्हा घरवापसी करणार का?.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now