health : भारतीय खाद्य संस्कृतीत भात हा प्रमुख पदार्थांपैकी एक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भात प्रिय असतो. परंतु शुगरचे पेशंट, डायबिटीस असणारी लोकं डॉक्टरच्या सल्ल्याने आहारामध्ये कमी भात खातात. मात्र तरीही अनेक सण- उत्सवांना विविध भाज्या टाकून केलेला पुलाव तसेच नॉनव्हेज प्रेमी कोण असेल तर खास हैदराबादी स्टाईलने केलेली बिर्याणी सणासुदीची रंगत वाढवते आणि आपल्या जेवणाला अधिक टेस्टी करते.
मात्र हाच भात शिजवण्याच्या पद्धतीवरून अनेक वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. संशोधन होत आहे. त्याबाबतचा अहवालही काही वृत्त संस्थांनी प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार भात नेमका कसा शिजवावा? याबाबत संशोधन करण्यात आले. भात शिजवण्याच्या तीन पद्धतींचा अभ्यास करण्यात आला होता.
त्यानुसार पहिली पद्धत- ३ तृतीयांश पाण्यामध्ये एक वाटी तांदूळ शिजवून घेणे. दुसरी पद्धत, ५ तृतीयांश भाग पाण्यामध्ये एक भाग तांदूळ शिजवून घेणे. आणि तिसरी पद्धत तांदूळ भिजवून घेणे व त्यानंतर शिजवणे. या तिन्ही पद्धतींचा वापर केल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आले. त्यात पहिल्या पद्धतीनुसार, शिजवलेल्या भातात आर्सेनिकचे प्रमाण ५०% आढळून आले. मात्र तिसऱ्या पद्धतीनुसार, ३ ते ४ तास तांदूळ भिजत घालून नंतर भात करण्यात आला. त्यामध्ये आर्सेनिकचे प्रमाण ८० % टक्के कमी झाले होते. हा भात आरोग्यासाठी चांगला असल्याचे आढळून आले.
मात्र मागणी वाढत चालल्याने शेतकरी पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून पिकांवर वेगवेगळ्या रासायनिक खतांची फवारणी करतात. यामुळे रासायनिक खतांमधील काही विषारी पदार्थ भाताला दूषित करण्यास कारणीभूत ठरू शकतात. ह्या टॉक्सिन्समुळे तांदळातील आर्सेनिक विषाचं प्रमाण वाढते. ज्यामुळे कॅन्सर, हार्ट अटॅकचा धोका तुम्हाला वाढू शकतो.
त्यामुळे भात बनवण्याआधी तांदूळ ३ ते ४ तास आधी भिजत घालून त्यानंतर शिजवून घेणे, ही पद्धत फायदेशीर आहे. त्यामध्ये आर्सेनिकचे प्रमाण कमी आढळते. या पद्धतीने भात शिजवल्यास शरीराला फायदा होऊ शकतो. क्विन्स युनिव्हर्सिटी बेलाफास्टच्या तज्ञांनी याबाबत संशोधन केलं होतं.
भारतीय खाद्य संस्कृतीत शरीरासाठी पोषक, आरोग्यवर्धक अशा सर्व पदार्थांचा रोजच्या जीवनात समावेश असतो. मात्र ते पदार्थ योग्य प्रमाणात घेण्यात अथवा ते बनवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्यास शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घेणे येथे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
Amit Thackeray : …अन् अमित ठाकरेंनी थेट जॅकी श्रॉफचे धरले पाय, कार्यक्रमात नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
Dhananjay Munde : “आमचं बहीण-भावाचं नातं आता…” पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Ajit Pawar : “…त्याचा पक्षाशी संबंध नाही” छगन भुजबळांनी केलेल्या ‘त्या’ विधानानंतर अजित पवारांनी झटकले हात