अब्जाधीश उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांनी आता ट्विटर ही मायक्रो-ब्लॉगिंग साइट विकत घेत्तली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटर खरेदी करण्यासाठी एलोन मस्क(Elon Musk) यांना तब्बल ४४ बिलियन डॉलर( ३. ३० लाख कोटी रुपये) मोजावे लागले आहेत. या कराराला अंतिम मंजुरीही मिळाली आहे.(businessman Elon Musk has become the new owner of Twitter)
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी या करारासंदार्भात ट्विटरच्या बोर्ड सदस्यांची एक बैठक झाली होती. यामध्ये ट्विटरचे ११ बोर्ड सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी मिळून अंतिम कराराचा निर्णय घेतला आहे. या करारानंतर ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कंपनीचे भविष्य अंधारात असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.
उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांना ट्विटरच्या प्रत्येक शेअरसाठी ५३.२० डॉलर मोजावे लागले आहेत. यापूर्वी एलोन मस्क यांची ट्विटरमध्ये ९ टक्के भागीदारी होती. आता या करारानंतर एलोन मस्क यांची ट्विटर कंपनीमध्ये १०० टक्के भागीदारी असणार आहे. ट्विटरच्या सर्व शेअरधारकांना प्रत्येक शेअरसाठी ४१४८ रुपये मिळणार आहेत .
ट्विटरसोबत करार झाल्यानंतर उद्योगपती एलोन मस्क यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एलोन मस्क यांनी कंपनीमध्ये मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. एलोन मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे आणि ट्विटर हे त्याचेच एक डिजिटल माध्यम आहे.”
एलोन मस्क यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, “या डिजिटल माध्यमावर मानवतेच्या भविष्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते. मला त्यात नवीन वैशिष्ट्ये जोडून ते पूर्वीपेक्षा चांगले बनवायचे आहे. ट्विटरचे अल्गोरिदम ओपन सोर्स केले जाईल जेणेकरून लोकांचा विश्वास जिंकता येईल. ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. मी कंपनीसोबत काम करण्यास उत्सुक आहे”, असे उद्योगपती एलोन मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे जगभरात २१७ दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. यापैकी सर्वाधिक ७७ दशलक्ष अमेरिकेत आहेत. यानंतर जपानमध्ये ट्विटरचे सर्वात जास्त वापरकर्ते आहेत. यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात ट्विटरचे २४ दशलक्ष वापरकर्ते आहेत. जगभरात दररोज सुमारे ५०० दशलक्ष ट्विट केले जातात. विशेष म्हणजे ३८ टक्के ट्विटर युजर्स २५ ते ३० वयोगटातील आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
यापुढे किरीट सोमय्यांवर हल्ला केल्यास कमांडो थेट गोळ्या घालणार; पहा कुणी दिलेत ‘हे’ आदेश
सोमय्यांवरील हल्ल्याची CISF ने घेतली गंभीर दखल, हल्लेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?, भाजपचा आव्हाडांवर हल्लाबोल