Share

प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून ऐका अपघाताचा थरार! एसटी बस नदीच्या पाण्यात नाही, खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली

crime news

आज झालेल्या भयानक अपघाताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. जळगावच्या अंमळनेरकडे ही बस निघाली होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली.

धक्कादायक बाब म्हणजे, पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पंधऱा प्रवाशांना वाचवण्यात यश मिळाले आहे. अपघातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरजवळ अपघात झालेली एसटी बस  MH 40 N 9848 ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगारची असल्याची माहिती मिळालीआहे. ही बस सकाळी 7.30 ला इंदूरमधून अमळनेरच्या दिशेनं रवाना झाली होती.

अपघाताचे थरारक फोटो देखील आता सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे. याचबरोबर प्रत्यक्षदर्शींनी देखील या अपघाताचा थरार सांगितला आहे.  प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, ‘बस खाली कोसळली ती थेट पाण्यात न कोसळता खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली त्यानंतर ती पाण्यात पलटली.’

दरम्यान, बस पाण्यात गेल्यानंतर ज्यांना पोहायला येत होते, ते बसबाहेर पडले आणि त्यांनी खांबाच्या चौथऱ्याचा आधार घेतला. काहींना वाचविण्याचाही प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.  आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच मृतदेहांची ओळख पटल्याचे सांगितले जात आहे. यापैकी तिघे जळगावचे तर दोन राजस्थानचे असल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हातातले शिवबंधन सरणावर गेल्यावरच सुटेल; पक्ष सोडतानाही शिवसेना नेत्याची भावूक प्रतिक्रिया
तुमच्या ‘या’ सवयींमुळे वयाच्या आधीच तुम्ही दिसू शकता म्हातारे; वाचा त्यावरील उपाय …
शाहरूख आणि काजोलबद्दल उडाली ‘ही’ अफवा, ऐकल्यावर अजय देवगणलाही लागेल मिर्ची
सोशल मीडियाचा वापर करत ‘या’ चार तरुणांनी उलथवून टाकली श्रीलंकेतील राजपक्षे कुटुंबाची सत्ता

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now