Share

Team India: टिम इंडियाचं सर्वात मोठं टेंशन मिटलं, बुमराहची उणीव भरून काढणार ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज

Team India, Australia, World Cup, Rohit Sharma, Arshdeep Singh/ 2022 च्या T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. टीम इंडियाने सोमवारी पर्थमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिला सराव सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली, तर एका युवा गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने सर्वांना खूश केले.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना टीम इंडियाने 20 षटकात 6 गडी गमावून 158 धावा केल्या. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावा केल्या.

या सामन्यात 23 वर्षीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा भाग नाही, त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष अर्शदीप सिंगवर असणार आहे. अर्शदीप सिंगने अलीकडच्या काळात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

अर्शदीप सिंग शेवटच्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराहप्रमाणे यॉर्कर टाकण्यासाठी ओळखला जातो. त्याच वेळी, तो अर्शदीप सिंगच्या षटकांमध्ये अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करतो. अर्शदीप सिंगने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 3 षटके टाकताना 2 च्या इकॉनॉमीमध्ये केवळ 6 धावा दिल्या आणि 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

अर्शदीप सिंगची ही घातक गोलंदाजी टीम इंडियासाठी टी-20 विश्वचषक 2022 पूर्वी चांगली चिन्हे आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंग व्यतिरिक्त युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारने 2-2 विकेट घेतल्या. युझवेंद्र चहलला या सामन्यापूर्वी विकेट्स मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता, परंतु या सामन्यात त्याने 15 धावांत 2 बळी घेतले.

महत्वाच्या बातम्या-
Team India: टीम इंडियाच्या विजयातही ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात मोठा खलनायक, वर्ल्ड कपमधून होणार पत्ता कट?
Team India: टीम इंडियाच्या एकाही कर्णधाराला ‘या’ खेळाडूची नाहीये किंमत, दरवेळी बसावे लागतेय बेंचवर
World Cup: टीम इंडियाला ‘या’ खेळाडूशिवाय टी२० वर्ल्ड कप जिंकणे कठीण, आता करतोय कहर

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now