bull angry on old man | जशाच तसे अशी म्हण आहे. म्हणजे तुम्ही जर कोणासोबत चुकीचे केले तर तुमच्यासोबतही चुकीचेच होणर आहे. आता ही म्हण सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका वृद्ध व्यक्तीने मुक्या प्राण्याला जी वागणूक दिली, त्याचे फळ त्याला दोनच मिनिटांत मिळाले आहे.
सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एका व्यक्ती स्वत:हून बैलाशी पंगा घेतो. तो व्यक्ती त्या बैलाला काठी मारतो. त्यामुळे संतापलेला बैलाने त्या वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली आहे. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
ट्विटरवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अवघ्या २७ सेकंदांचा आहे पण त्यात आयुष्यात कसे वागू नये हे सांगितले गेले आहे. आता आपण हे जाणून घेऊ नक्की व्हिडिओमध्ये काय झालं. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहता तो एखाद्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगसारखा दिसतो.
म्हाताऱ्याच्या अंगात लय किडे… 😂😂😂😂उगाच खोड काढायची काय गरज होती का? pic.twitter.com/wZMeRT6RIG
— किरण… (@Coolkiranj) October 8, 2020
व्हिडिओच्या सुरुवातीला एक शांत बैल रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात पांढरा धोतर-कुर्ता घातलेला एक म्हातारा माणूस तिथे येतो. त्यावेळी त्याच्या हातात काठी असते. त्यानंतर तो वृद्धव्यक्ती रस्त्यात शांतपणे उभ्या असलेल्या बैलाला काठीने मारतो.
तो त्या बैलाला का मारतो? हे माहिती नाही. पण व्हिडिओमध्ये दिसते की तो शांत बैलाला काठीने मारतो. अशा वेळी बैलालाही राग येतो आणि तो म्हाताऱ्याला जोरात मारतो. त्यामुळे वृद्ध व्यक्ती काही सेकंदांसाठी हवेत उडतो आणि जोरात खाली पडतो. त्यानंतर बैल तिथून निघून जातो.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनीही त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने या घटनेला वृद्ध जबाबदार असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडिओ ५२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा विजय झाला निश्चित; ‘हे’ सर्वात मोठे कारण आले समोर
Eknath shinde : सुप्रिया सुळेंवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या सत्तारांवर मुख्यमंत्री भडकले, तातडीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आलिया आई झाल्यानंतर महेश बाबूने केली खास पोस्ट; म्हणाला, ‘मुलीच्या जन्मापेक्षा जगात…