buldhana teacher car accident | नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीत अनेकांच्या घरी नवीन गाड्या आल्या आहेत. घरात नवीन गाडी आली तर प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला ती यायला हवी. पण कार शिकण्याच्या नादात एका महिलेने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तसेच त्या महिलेसह तिच्या मुलीचाही अपघातात मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील आहे. घरात नवीन कार आल्याने एक महिला आपल्या मुलीसह गाडी शिकत होती. पण तिचा अपघात झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे.
देऊळगावराजातील रामनगरमध्ये शिक्षक अमोल मुरकुटे राहतात. ते आपली पत्नी स्वाती मुरकुटे यांना कार शिकवत होते. त्यावेळी त्यांची मुलगी सिद्धी मुरकुटे ही सुद्धा कारमध्येच होती. त्यामुळे तिचाही मृत्यू झाला आहे. सिद्धी लहान असून ती पाचवीत शिकत होती.
अमोल हे पत्नीला कार शिकवत होते. त्यावेळी रोडवर असताना त्यांचा कारवरचा ताबा अचानक सुटला होता. त्यामुळे ती कार थेट ७० फुट खोल विहिरीत कोसळली. या अपघातानंतर अमोल मुरकुटे गाडीच्या खिडकीतून बाहेर आले. पण स्वाती आणि सिद्धीला मात्र कारमधून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा त्याच्यातच मृत्यू झाला.
तसेच यावेळी अमोल मुरकुटे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर स्वाती मुरकुटे आणि सिद्धी मुरकुटे यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमनदलाची गाडी बोलवण्यात आली होती. आता दोघांनाही बाहेर काढण्यात आले आहे.
स्वाती मुरकुटे आणि सिद्धी मुरकुटे या दोघांचा अपघात झाल्यामुळे मुरकुटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर या अपघातामुळे तेथील रामनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघाताची संख्या वाढताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज





