Share

VIRAL: ‘या’ माणसाच्या अंगात येतोय महीषासुर, प्राण्यांप्रमाणे खातो चारा आणि गवत; पहा व्हिडीओ

budhiram mahishasur viral video | सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड होत असतात. त्यामध्ये काही व्हिडिओ हे खुप विचित्र असल्यामुळे सोशल मीडियावर ते खुप व्हायरल होतात. अनेकदा मंदिरातील व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ हा जरा जास्तच विचित्र आहे. कारण त्यामध्ये एक माणूस एखाद्या प्राण्याप्रमाणे गवत खाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की, तो ते खूप आवडीने खात आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वक्तीच्या अंगात महीषासुर आलेला असल्याचे म्हटले जात आहे. दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी महीषासुर त्याच्या अंगात येतो, असे तेथील लोक म्हणतात. त्यानंतर तो प्राण्यांप्रमाणे चारा आणि गवत खाण्यास सुरुवात करतो. बुधीराम असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बुधीराम रोडवेजमधून निवृत्त झाला आहे आणि कोल्हुईच्या रुद्रपूर शिवनाथ गावात राहतो. नागपंचमी येताच महीषासुर बुधीरामच्या अंगात येतो, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यानंतर तो गवत आणि पेंढ्या खाऊ लागतो. बुधीरामला पाहण्यासाठी अनेक लोक जमतात. त्याला हे खाताना पाहण्यासाठी इतर गावातूनही खूप लोक येतात.

https://twitter.com/Mahansharma6/status/1554796038761787392?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1554796038761787392%7Ctwgr%5Ee2d671ef781daf3f3b14a35eeeb3cbed434d9e2c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fzeesalaam%2Fnews%2Fa-man-of-uttar-pradesh-rudrapur-convert-into-bhaisasur-on-every-nagpanchmi-video-viral-on-internet-smi%2F1289917

व्हिडिओमध्ये बुधीरामच्या मागे भिंतीवर जय बाबा महीषासुर असे लिहिलेले दिसत आहे. व्हिडिओमध्ये बुधीराम समोर असलेल्या पेंढ्या आणि गवत खाताना दिसत आहे. बुधीराम मंदिराजवळ स्थापित महीषासुर पुतळ्यासमोर बसून प्राण्यांप्रमाणे गवत खात आहे.

या दरम्यान अनेक लोक तिथे येऊन त्याला केळी खाऊ घालत आहे. तसेच फुलांचे हार त्याला घालत आहे. रिपोर्टनुसार, बुधीराम स्वतः सांगतो की, गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून महीषासुर त्याच्या अंगात येत आहे. नागपंचमीच्या वेळी त्यांच्यासोबत असे घडते. रोज तो सामान्य राहतो.

महत्याच्या बातम्या-
Supriya Sule: …तर आगामी निवडणूकीत सुप्रिया सुळेंचा पराभव अटळ; महादेव जानकरांनी सांगितला नामी उपाय
आयुष्यातली पहिली निवडणूक शरद पवार कसे जिंकले?; त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानेच सांगितला हा खास किस्सा
…त्यामुळे शिंदे गटाचे सगळे आमदार अपात्र होणार; बड्या नेत्याने सांगीतली कायद्याची मेख

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now