मधल्या काळात सोशल मिडियावर एका बहिण भावाची जोडी आपल्या डान्सच्या कलेमुळे प्रचंड चर्चेत आली होती. या दोघांनी आपल्या डान्सचे व्हिडीओ युट्युबवर टाकले होते. ज्यातून या बहिण भावाने बक्कळ पैसा आणि प्रसिद्धी कमवली. परंतु त्यांच्या या प्रसिद्धी मागील सत्य कहाणी कोणासमोरच आली नाही. झारखंडच्या सुदूर भागात राहणाऱ्या या बहिण भावाच्या जोडीने एकेकाळी खूप हालअपेष्टा सहन केल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या डान्समधून प्रसिध्दी मिळविणाऱ्या या बहिण भावाचे नाव सनातन आणि सावित्री आहे. शिक्षण झाल्यानंतर सनातनला त्याच्या योग्य कोणतेही काम मिळाले नाही. त्यामूळे वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने शेतात काम करण्यास सुरुवात केली. यानंतर सनातनच्या मदतीला त्याची बहिण सावित्री सुध्दा येऊ लागली.
यादरम्यानच कामातून वेळ काढत सावित्री आणि सनातने आपल्या डान्यचे व्हिडीओ युट्युबवर टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अनेकांनी त्या दोघांचे हसू केले. तसेच त्यांची थट्टा उडवण्यात आली. परंतु हे दोघे बहिण भाऊ मागे हटले नाहीत. त्यांनी अनेक डान्सचे व्हिडीओ सोशल मिडियावर अपलोड केले.
यानंतर त्या दोघांच्या व्हिडीओला लोकांनी पसंत करण्यास सुरुवात केली. बघता बघता या दोघांच्या व्हिडीओला लाखात व्ह्यूज मिळू लागले. यामुळे त्यांना युट्युबकडून पैसे मिळण्यास सुरुवात झाली. मिळालेल्या पैशातून या दोघांनी आपल्यावर असणारे सर्व कर्ज फेडून टाकले. तरी त्यांच्या कमाईतील अर्धी रक्कम ही कमी झाली नाही.
सध्या हे दोघे युट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत. याचबरोबर ७ परिवारांच्या पालनपोषणाची जबाबदारी या दोघांनी स्विकारली आहे. युट्यूबवर आपली कला सादर केल्यामुळे या दोघांना चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे. आता त्यांची गरीबी दूर झाल्यामुळे हे बहिण भाऊ व्यवस्थितरित्या नवनवीन गोष्टी शिकत आहेत.
महत्वाच्या बातम्या
भरधाव रेल्वेसमोर तरुणाने मारली उडी, प्राणाची बाजी लावत पोलिसाने वाचवला जीव; पहा थरारक व्हिडीओ
अमोल कोल्हे म्हणतात, मैं थकेगा नहीं साला… हातात टायर अंगात फायर; पहा कोल्हेंचा फिटनेस व्हिडिओ
अमिताभ बच्चनसोबत होळी खेळल्यामुळे पती संतापला अन् आठ दिवस मला…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
रणदीप हुड्डा साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका, मांजरेकरांचे दिग्दर्शन; पहा फर्स्ट लूक