मध्यप्रदेशच्या शिवपुरी (shivpuri) जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, काही लोक एका तरुणाला बेदम मारहाण करत आहेत. हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील बदरवास परिसरातील आहे. मारहाण करणारा तरुण आपल्या प्रेमिकेला पळवून नेण्यासाठी आला होता, असे सांगण्यात येत आहे.(Brother slaps sister’s boyfriend)
यादरम्यान प्रेमिकेच्या भावांनी त्या दोघांना पकडले. त्या दोघांना पकडल्यानंतर प्रियसीच्या (तरुणीच्या) भावाने तिथे प्रियकराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोमवारचा आहे. पीडित तरुणाला लोक रस्त्यावर ओढत आहेत. यासोबतच त्याच्यावर लाथा-बुक्क्यांचा वर्षाव होत आहे.
सरबेस असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव सांगितले जात आहे. तो आपल्या प्रियसीसोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मुलीच्या भावांनी त्याला मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मुलीचा भाऊ प्रियकराला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहे. प्रेयसी भावांसमोर बॉयफ्रेंडला वाचवण्यासाठी हात जोडत आहे पण कोणीही ऐकायला तयार नव्हते.
तरूण आपल्या प्रियसीसोबत घरातून निघून गेल्याचे बोलले जात आहे. तो बस स्टॉपवर उभा होता. यादरम्यान बस उशिरा आली. दोघेही बसस्थानकावर गाडीची वाट पाहत होते. मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता.
घरचे बसस्थानकावर पोहोचले तेव्हा तरुणी तिच्या प्रियकरासोबत उभी होती. त्यानंतर तिच्या घरचे संतापले आणि प्रियकरावर राग काढायला सुरुवात केली. त्यानंतर मुलीच्या भावांनी सरबेस यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा-बुक्क्यासोबतच ते तरुणांना बेल्टने मारहाण करत होते.
सरबेस सतत दयेची याचना करत होता. पण ते मान्य करायला कोणी तयार नव्हते. मारहाण करणाऱ्या लोकांनी मुलीला आपल्यासोबत घरी नेले. मारहाण झाल्यावर तरुणही घरी गेला. कोणत्याही बाजूने तक्रार दाखल केलेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान लक्ष्मीकांत बेर्डे सोबत एक शब्दही बोलत नसायचा; खरे कारण आले समोर
‘आमच्या घरात नाक खुपसू नका’, हिजाब प्रकरणावरून ओवेसींनी पाकिस्तानला सुनावलं
महाराष्ट्रातील तरुण हिजाब प्रकरणावरुन भडकले; म्हणाले, विद्यार्थीनी मंगळसुत्र घालतात, कुंकू लावतात ते चालत का?
लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा खुलासा, शेवटच्या क्षणातही आनंदी होत्या लता मंगेशकर