मनसेच्या राज ठाकरेंशी पंगा घेत देशात चर्चेत आलेले भाजपा खासदार बृजभूषण सिंह मुंबईत येणार आहे. शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी बृजभूषण सिंह यांची भेट घेऊन त्यांना मुंबई येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवा खेळ रंगणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (Will Brijbhushan Singh who challenged Raj Thackeray come to Mumbai?)
दिपाली सय्यद यांनी बृजभूषण सिंह यांची भेट घेतली. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, ‘भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह डॅशिंग माणूस.. जे बोलतो ते करतो.’
पुढे त्या म्हणाल्या की, ‘महाराष्ट्र महिला केसरी लवकरात लवकर व्हावी. यासाठी त्यांची भेट घेतली. लवकरच ते मुंबईत येणार आहेत. त्यांची भेट करून दिल्याबद्दल शरद पवार साहेबांचे धन्यवाद!’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. महाराष्ट्रभरातील मनसे कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी साद घातली. परंतु त्यांच्या अयोध्येत दौऱ्याला यूपीचे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी जाहीरपणे विरोध केला.
राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही. त्यांनी आधी माफी मागावी, अशा प्रकारची वक्तव्य बृजभूषण सिंह यांनी केली. काही दिवसांनी पुण्यातील सभेत राज ठाकरेंनी हे मोठे राजकीय षडयंत्र आहे. मनसे कार्यकर्त्यांसाठी रचलेल्या या सापळ्यात मला कार्यकर्त्यांना गमवायचे नाही, असे म्हणत अयोध्या दौरा रद्द केला.
महाराष्ट्राच्या राज ठाकरेंसारख्या करारी नेत्याला डिवचणारे बृजभूषण सिंह आता मुंबईत येणार. त्यांना येण्यासाठी शिवसेनेने आमंत्रण दिले आहे. यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात मोठा राजकीय आखाडा रंगणार असल्याचे चित्र दिसते.
महत्वाच्या बातम्या-
शेवटच्या श्वासापर्यंत नेतृत्त्वाची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिलं ‘शपथपत्र’
ओपनिंग डेला विक्रांत रोनाने ठेवली लाज तर शमशेरा ठरला सुपरफ्लॉप, वाचा कमाईची आकडेवारी
….तर आम्ही एकनाथ शिंदेंनाही सोडणार होतो; शहाजीबापूंचा खळबळजनक गौप्यस्फोट