Share

राज ठाकरेंना कडाडून विरोध करणाऱ्या बृजभूषणने आदित्य ठाकरेंचे केले जंगी स्वागत

aditya thackeray

भाजप खा. ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामधील वाद संपूर्ण राज्याला माहितीये. खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सुरवातीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला होता. राज ठाकरे दबंग नाहीतर उंदीर आहेत. ते पहिल्यांदा बाहेर पडत आहेत”, अशा शब्दात शरण सिंह यांनी राज यांच्यावर टीका केली होती.

मात्र खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे अयोध्या दौऱ्यावर जंगी स्वागत केले आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याच स्पष्ट केलं होतं. याच पार्श्वभूमीवर बृजभूषण शरण सिंह यांनी भाष्य केलं आहे.

याबद्दल माध्यमांशी बोलताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले, ‘आदित्य ठाकरे अयोध्येत येणार आहे, याची आम्हाला कल्पना आहे. त्यांना कोणीही विरोध करणार नाही. त्यांना कोणत्याही मंदिरात जायचे असल्यास कोणीही विरोध करणार नाही,’ असं बृजभूषण शरण सिंह यांनी स्पष्टच सांगितलं.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शरयू नदीच्या किनारी शिवसेना खासदार संजय राऊत हे बृजभूषण सिंह यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जाणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बृजभूषण सिंह हे चर्चेत आले आहेत.

काय आहे वाद राज ठाकरे आणि बृजभूषण सिंह यांच्यातील..? काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना इशारा दिला होता. “मी राज ठाकरे यांना २००८ पासून शोधत आहे. जर राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन”, असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले होते.

“राज ठाकरे यांचं आता विचार बदलला आहे. आता त्यांना अयोध्येला यायचं आहे. पण जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही. आम्ही सगळे रामाचे वंशज आहोत आणि त्याच लोकांना राज ठाकरे यांनी अपमानित केलं आहे. त्यामुळे ज्यावेळी राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागतील, त्याचवेळी त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देऊ”, असे देखील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या
नाद खुळा! सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या जॉब लाथ मारत पाळली गाढवं; आता कमवतोय लाखो रुपये
अनुपम खेर वडील का होऊ शकले नाहीत? पत्नी किरण खेर यांचा मोठा खुलासा
सापासारखे सरपटणारे एलियन्स पृथ्वीवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात; वैज्ञानिकांनी दिला ‘हा’ इशारा
‘या’ IPS ने संजय दत्तला सगळ्यांसमोर चोपला होता; वाचा त्यांनी स्वत:च सांगीतलेला थरारक किस्सा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now