भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंसोबत झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. याबाबत कुस्तीपटूनी दिल्लीत अनेक दिवस आंदोलन देखील केले होते.
यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असताना आता ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भात महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली होती. यामुळे याचा त्यांना राग आला.
त्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन करत त्यांनी महिला पत्रकाराचा माईक आणि कॅमेराही तोडला. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे. पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्यास नकार देत ब्रिजभूषण यांनी कारचा दरवाजा आपटला.
त्यामुळे महिला पत्रकाराच्या माईकचे नुकसान झाले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे मोदी सरकार त्यांना का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला असता ब्रिजभूषण सिंग यांनी तुमच्याशी काही बोलायचे नाही, असे सांगितले. नंतर ब्रिजभूषण यांना त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न केल्यावर मात्र ते भडकले.