काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत.
मात्र अशातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.
यावरून मनसे नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ब्रिजभूषण सिंह यांना मनसे स्टाईलने प्रत्युत्तर दिले. ‘मनसे छोट्या-मोठ्या धमक्यांना भीक घालत नाही,’ असं म्हणत पानसे यांनी माध्यमांशी बोलताना ब्रिजभूषण सिंह यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.
आता पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आक्रमक पवित्रा घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना इशारा दिला आहे. “राज ठाकरेंना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही, पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही” असं म्हटलं आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.
पुन्हा आक्रमक होतं ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, “उत्तर भारतीय आणि मराठी माणूस यांच्यातील वाद मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी निर्माण केला. हे माझं व्यक्तिगत मत आहे. पक्षानं सांगितलं तरी भूमिकेपासून मागे हटणार नाही. राज यांना एअरपोर्टवरून बाहेर पडू देणार नाही” असं म्हटलं आहे.
दरम्यान, ‘जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका,’ असा सल्लाही ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याआधी भाजपा नेते आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. बॅनरबाजी करत भाजप नेत्यांना राज यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
महाआरतीला गैरहजर राहिल्यानंतर राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला सल्ला; म्हणाले, वसंत तु…
मातृदिनानिमित्त आईचे उत्तम उदाहरण! लहान वयात पतीचा मृत्यू, शेती करून मुलांना बनवले अधिकारी
ख्रिस गेलने IPL मध्ये करणार कमबॅक, म्हणाला, मी परत येण्यास तयार आहे पण मला…
ना गूढ, ना एलियन्सचा अड्डा; शास्त्रज्ञाने सोडवले बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य, सांगितले का नाहीशी होतात विमाने