Share

दोन वर्षात ६ लग्न, सगळ्यांसमोर बाईकवर बसून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली नवरी; कुटुंबीयही बघतच राहिले

मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एका नववधूला लुटल्याची घटना समोर आली आहे. स्वत:ला अनाथ सांगणाऱ्या या तरुणीने न्यायालयाच्या आवारात असलेल्या मंदिरात लग्न केले, त्यानंतर वराला चकमा देत दागिने आणि रोख रक्कम घेऊन सर्वांसमोर प्रियकरासह दुचाकीवरून पळ काढला. काही वेळातच वकिलांनी लुटलेल्या वधूसोबत आलेल्या कथित काकूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.( bride ran away with boyfriend)

चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांसमोर आले. दोन वर्षांत अर्धा डझनहून अधिक विवाह लावून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. छिंदवाडा येथील रहिवासी असलेला दशरथ पटेल दोन दिवसांपूर्वी मोठी स्वप्ने पाहून लग्नासाठी जबलपूरला आला होता. त्याने नववधू म्हणजेच रेणू राजपूत हिच्यासोबत मंदिरात सात फेरेही घेतले.

यानंतर दोघेही कोर्टात लग्नाची नोंदणी करण्यासाठी जात होते, मात्र यादरम्यान बाइकवर बसलेली वधू बाइकवरून उतरली आणि दुसऱ्या दुचाकीस्वारासह फरार झाली. वधू अचानक पळून गेल्यानंतर, वर आणि त्याचे नातेवाईक ताबडतोब न्यायालयाच्या आवारात परतले, जिथे तिची मावशी अर्चना बर्मन यांना वकिलांनी पकडले. माहिती मिळताच ओमटी पोलीस घटनास्थळी पोहोचले व महिलेला पकडून पोलीस ठाण्यात आणले.

पीडिताच्या बाजूने, वराचे काका आणि काकू जबलपूर येथे राहतात आणि किराणा दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात एक महिला वारंवार येत असे. दशरथची मावशी सुनीता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्या महिलेशी तिच्या पुतण्याच्या लग्नाबाबत चर्चा केली, त्यानंतर महिलेने तिला रांझी येथील रहिवासी असलेल्या तिच्या भाचीबद्दल सांगितले.

वराच्या काकूने सांगितले की, महिलेने सांगितले की रेणूला आई-वडील नाहीत आणि तिच्या लग्नाची जबाबदारी तिच्यावर आहे. यानंतर दोन्ही पक्षांनी लग्नासाठी 1 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. ओमटी पोलीस ठाण्याचे प्रभारी एसपीएस बघेल यांनी सांगितले की, आरोपी रेणू उर्फ ​​संगीता अहिरवार आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

त्याची चौकशी करण्यात येत असून या लोकांनी यापूर्वीही अशा प्रकारची घटना घडवून आणली असावी, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कथित मावशी अर्चना पोलीस कोठडीत असल्याची माहिती मिळताच वधू रेणू हिने रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठले मात्र तिच्याकडे दागिने व पैसे नव्हते. पोलिसांनी रेणूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती धन्वंतरीनगर येथील रहिवासी संगीता अहिरवार आहे असे समजले.

संगीता अहिरवारकडे रेणूच्या नावाने बनावट आधारकार्डही असल्याचे समोर आले. सुरुवातीच्या चौकशीत 2 वर्षात सहा लग्न केल्याचे सांगितले. पोलिसांनी रेणू उर्फ ​​संगीता, अर्चना बर्मन, अमर सिंह आणि रेणूचा प्रियकर अजय यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या सर्वांसह आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे

महत्वाच्या बातम्या
नाद खुळा! ६ लाख खर्चून शेतकऱ्याने घरावर बसवला खराखुरा ट्रॅक्टर; ‘हे’ आहे कारण…
शाहरूख खानसाठी उर्मिला मातोंडकर मैदानात, म्हणाली, ‘याला थुंकणे नाही फुंकणे म्हणतात’
वडिलांच्या निधनानंतर सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर; म्हणाला, वडील गमावल्यानंतर माझी..
“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत”

लेख

Join WhatsApp

Join Now