लग्न हे एक पवित्र बंधन असते. भविष्याच्या नवीन पायरीवर टाकलेले एक पाऊल म्हणजे लग्न. जीवनातील एक वाटचाल असते हे बंधन. भूतकाळातील घटित घटनेला भूतकाळातच ठेऊन भविष्याकडे वाटचाल केली जाते.
परंतू हाच भूतकाळ जर परत येऊन ठाकला तर? असा प्रश्न पडला असताच, विचारांचा गुंता होतो. असाच एक प्रकार एका लग्नात घडला आहे. चीनमधील एका लग्नात हा प्रकार घडला आहे. नवरीने चक्क तिच्या ५ एक्स- बॉयफ्रेंडला लग्नात बोलावले होते.
संपूर्ण लग्नात या ५ जणांना खास वागणूक दिली गेली. तसेच त्यांना जेवणासाठी वेगळा टेबलही देण्यात आलेला होता. यामुळे हे लग्न चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर याबद्दल चांगलाच बोलबाला सुरू आहे. नेटकऱ्यांनी यावर चांगल्याच भन्नाट कमेंट केल्या आहेत.
हुबेई येथे ८ जानेवारीला हे लग्न झाले होते. या लग्नाचे फोटो चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, Douyin प्रकाशित करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये हे ५ मुलं जेवणासाठी बसलेले दिसत आहेत. हे ५ मुलं वधूचे एक्स- बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे.
या ५ जणांना लग्नासाठी खास बोलावण्यात आले होते. त्यांच्यासाठी मांडलेल्या टेबलवर त्यांचे नावही लिहिलेले होते. ‘टेबल ऑफ एक्स-बॉयफ्रेंड’ असे त्या टेबलवर नमूद केलेले होते. व्हायरल झालेले फोटो पाहून लोकांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे,’ लग्नात एक्स-बॉयफ्रेंडला बोलावणे खुप धाडसाचे असते. त्यामुळे संबंध बिघडू शकतात’, अजून एक जण म्हणाला की, मला खरंच आश्चर्य वाटत आहे. काहीजणांनी या घटनेवर संतापही व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
‘या’ कारणामुळे लग्नात रितेश ८ वेळा जेनेलियाच्या पाया पडला होता; जेनेलियाने स्वत:च सांगितला किस्सा
प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरींना करायचय लग्न, मात्र मुलगा असा हवा ज्याने आजवर एकाही मुलीसोबत..
मित्राच्या लग्नासाठी नाशिकचे दोन युवक गेले उत्तरप्रदेशात; पण तिथे घडली थरकाप उडवणारी घटना