मुंबई | भारतात अनेक प्रवचनकार आहेत. त्यातील एक प्रसिध्द महिला प्रवचनकार म्हणजे जया किशोरी आहेत. प्रवचनाबरोबरच प्रेरणादायी भाषणासाठी त्यांना ओळखले जाते. यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोणती व्यक्ती त्यांची जीवनसाथी बनू शकते हे सांगितले आहे.
प्रवचनकार जया किशोरी या भगवान श्रीकृष्णाच्या भक्त आहेत. त्यांनी श्रीकृष्णाला समर्पित असलेली अनेक भक्तिगीते गायली आहेत. माहितीनुसार जया किशोरी यांचा जन्म १३ जुलै १९९५ रोजी झाला होता. त्यांनी स्वत:ला ७ वर्षाच्या असताना आध्यात्माशी जोडून घेतले होते.
दरम्यान जया किशोरी या सोशल मीडियात खूप अॅक्टिव्ह असतात. त्या यूट्यूबच्या माध्यामातून लोकांशी संपर्क करतात. त्यांनी यूट्यूबवरील एका व्हिडीओत त्यांचा जीवनसाथी कशा प्रकारचा व्यक्ती बनू शकते हे सांगितले आहे. जया किशोरी म्हणतात, जो व्यक्ती माझ्यातील चांगल्या गोष्टी नव्हे तर वाईट गोष्टींवर प्रेम करेल आणि त्याचे निराकरण करतो तोच व्यक्ती माझा जीवनसथी होऊ शकतो.
जया किशोरी पुढे म्हणतात, व्यक्ती लग्नाचा निर्णय तात्काळ घेते. परंतु कधीकधी तो दिर्घकाळ टिकवून ठेवण्यास असमर्थ असते. असे संबंध तुटण्यामागील मुख्य कारण म्हणजे लोक एकमेकांना समजून घेत नाहीत.
लग्नाचा निर्णय मनापासून तसेच पूर्ण विचार करून घेतला पाहिजे. लग्नाचा अर्थ असा आहे की, एका व्यक्तीसोबत एका छताखाली जगावे लागते. त्यासाठी त्या व्यक्तीचे स्वरूप समजून घ्या. त्या व्यक्तीचा स्वभाव पूर्णपणे स्विकारू शकत असाल तरच लग्न करा नाहीतर वेळ घ्या.
जया किशोरी यांची अनेक भजने लोकप्रिय झालेली आहेत. भजनाचे अनेक चाहते आहेत. गुगलवर जया किशोरी यांच्या भजनांसोबतच त्यांच्या वयक्तिक आयुष्याविषयीची माहिती मोठ्या प्रमाणात सर्च केली जाते. त्यांच्या वैवाहिक आयुष्य, पती याबद्दल विचारणा केली जाते.
माध्यमांना जया किशोरी यांनी दिलेल्या मुलाखतीत असं म्हणले आहे की, योग्य वेळी मी लग्न करेन. दरम्यान त्या प्रवचनातून येणारा निधी उदयपूर येथील नारायण सेवा ट्रस्टला दान करतात. या पैशातून दिव्यांग व्यक्तींना मदत केली जाते. सोशल मीडियावर किशोरी यांच्या यूट्यूब आणि फेसबुकला लाखो लोक जोडलेले आहेत.
देशभरात भजन आणि कथांसाठी प्रसिद्ध असलेल्या जया किशोरी(Jaya Kishori) वयाच्या 6 व्या वर्षापासून अध्यात्मिक जगाशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच, भारतातील सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर जया किशोरी यांना किशोरी जी म्हणूनही ओळखले जाते. त्यांचे खरे नाव जया शर्मा आहे.
निवेदक जया किशोरी यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले की, ‘ती देखील सामान्य मुलगी आहे तर तिचेही लग्न होईल, परंतु तिचे लग्न कोलकातामध्ये(Kolkata), तिच्या निवासस्थानी झाले तर खूप चांगले होईल’ असे त्यांनी लग्नाबद्दल व्यक्त केले आहे. कोलकात्यातच लग्न करण्यामागचा त्यांचा हेतू असा आहे की त्याच शहरात लग्न करून त्या कधीही त्यांच्या माहेरच्या घरी येऊन जेवण करू शकतात.
पण जया किशोरी यांचे लग्न(Marraige) कोलकात्याच्या बाहेर कुठे झाले तर त्यांच्या पालकांनीही त्याच शहरात स्थायिक व्हावे, अशी त्यांची अट आहे. अशी अट ठेवण्यामागचे कारण म्हणजे लग्नानंतर त्यांना त्यांचे माहेरचे घर सोडून दुसऱ्याच्या घरी राहावे लागेल आणि त्यांना आई-वडिलांपासून दूर राहायचे नाही. जया किशोरी यांच्या कुटुंबात त्यांचे आई-वडील आणि एक बहीण आहे.