प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. तिने फेसबूकवर पोस्ट करत शरद पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी तिला विरोध केला आहे. (bramhan mahasangh angry on ketki chitale)
केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता ब्राम्हण महासंघाने सुद्धा यावर आक्षेप घेतला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर लिहिणं ही विकृतीच आहे, अशी भूमिका अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने मांडली आहे. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी यावर भाष्य केले आहे.
आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत वैचारिक शत्रुत्व कायम आहे. तसेच आम्ही भविष्यातही तितक्याच ताकदीनं लढत राहू. परंतू कोणत्याही व्याक्तीच्या आजारावर उपहासात्मक लिहिणं, त्यांच्या मरणाची वाट पाहणं ही विकृतीच आहे, असे आनंद दवे यांनी म्हटले आहे.
तसेच केतकी चितळेला शिक्षा झालीच पाहिजे, असेही आनंद दवे यांनी म्हटले आहे. केतकी चितळेने फेसबूकच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळेच ब्राम्हण महासंघही तिच्यावर आक्रमक झाला असून तिला शिक्षा द्यावी अशी मागणी करताना ते दिसून येत आहे.
केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत फेसबूकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवारांच्या आजारावरुन टीका केली आहे. या कवितेच्या खाली तिने ऍडव्होकेट नितीन भावे असे नाव लिहिले आहे.
केतकी चितळेच्या या पोस्टवर अनेकांनी संतापजनक कमेंट केल्या आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठाणे पोलिस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. तसेच आता तिच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
संतापलेल्या महिलांनी केतकी चितळेवर शाई फेकत तोंड केले काळे; तरीही हसत होती केतकी
मोठी बातमी! संतप्त महिलांनी केतकीचे तोंड केले काळे, पोलिस ठाण्यासमोरच घडली घटना
जाणून घ्या केतकीचा अभिनेत्री म्हणून प्रवास, ‘या’ आजाराने आहे त्रस्त; दिग्दर्शकावर केले होते ‘हे’ गंभीर आरोप