Share

…यामुळे शरद पवारांसोबतच्या बैठकीला ब्राह्मण महासंघाने दिला नकार; वाचा काय आहेत खरी कारणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज ब्राह्मण संघटनांसोबत बैठक बोलाविलेली असताना संघटनांमध्ये फूट पडली असल्याचे चित्र दिसत आहे. ब्राह्मण महासंघ व परशुराम सेवा संघाने बैठकीला नकार दिला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत आज ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या बैठकीचे निमंत्रण ब्राह्मण महासंघाने नाकारले. शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत आधी भूमिका जाहीर करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

दरम्यान, साताऱ्यात भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कवी जवाहर राठोड यांची कविता शरद पवार यांनी वाचून दाखवली होती. पवारांनी त्यांची कविता वाचून दाखवल्यानं अनेक ब्राह्मण संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. या कवितेच्या माध्यमातून पवारांनी हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याची टीका भाजप आणि ब्राह्मण संघटनांनी केली होती.

तसेच, तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ब्राह्मण समाजविरोधी विधान केलं होतं. मिटकरी यांचं ब्राह्मण समाजविरोधी विधान आणि पवारांचे कविता वाचन यामुळं राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं होतं. त्यानंतर झालेल्या टीका-टिपण्णीनंतर ते दुषित वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवळण्याचा प्रयत्न करणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात आज संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी 20 ते 22 संघटनांना पवारांनी निमंत्रण दिलं आहे.

मात्र या बैठकीला ब्राह्मण महासंघ व परशुराम सेवा संघाने नकार दिला. परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे पत्रक काढत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे गेले 20 वर्ष ब्राह्मण विरोधी भूमिका हे बहिष्काराचे कारण आहे. काही राजकीय नेते आपल्या आपले लिखाण तसेच वक्तव्यातून द्वेषमुलक वातावरण तयार करीत आहे.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ब्राह्मण विरोधी येत असलेल्या भूमिकांमुळे आम्ही हा बहिष्कार घालत आहे, असे देशपांडे पत्रकात म्हणाले. आता आज शरद पवार यांची ही पुण्यातील ब्राह्मण संघटनांसोबतची बैठक व्यवस्थित पार पडणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now