Share

झुंड, पावनखिंड चित्रपटांच्या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा उफाळला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद

jhund

कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला तरी त्या चित्रपटातून अनेक पैलू समोर येत असतात. त्यातलाच एक पैलू म्हणजे ‘जात’. आतापर्यंत अनेक चित्रपट यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. कोणताही नवीन चित्रपट आला, की तो आवडलेले आणि न आवडलेले असे दोन गट पडतात.

मात्र झुंडच्या बाबतीत काही प्रेक्षकांनी प्रतिक्रियांची जातीनुसार वर्गवारी केली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाने जातीभेदाचं वळणंही घेतल्याचं दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा वादावरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

तसेच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे चित्रपट समाजातल्या जात वास्तवावर भाष्य करणारे आणि लोकांच्या डोळ्यात एकप्रकारे अंजन घालणारे म्हणून नावाजले गेले. झुंडचाही त्याला अपवाद नाही. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फ्रेम असो की झोपडपट्टीतील कलाकारांचा सहभाग, या अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे हा चित्रपट चर्चेत होता.

प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची खूप चर्चा होताना दिसते आहे. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अभिनीत झुंड (Jhund Movie) या चित्रपटाची खूप चर्चा होताना दिसते आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 6.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटाची नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे.

बॉक्स ऑफिसवर झुंडला सध्या ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांची टक्कर आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ची 100 कोटींकडे वाटचाल होत आहे. तर दुसरीकडे ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळतोय. तसेच झुंड, पावनखिंड, गंगूबाई काठियावाडी, यापैकी कुठल्या कुठल्या चित्रपटाला सपोर्ट करायचं हे ठरवताना हे प्रेक्षक दिग्दर्शकाच्या जातीचा आधार घेत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, चित्रपटसृष्टीमधील अनेकांनी याविषयी खंत व्यक्त केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “जात जात नाही, तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. झुंड सिनेमा म्हणून पाहा.” केदार शिंदे यांचे हे ट्विट सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होतं आहे.

याचबरोबर या विषयी बोलताना लेखक-दिग्दर्शक गणेश मतकरी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “झुंड, बॅटमॅन, पावनखिंड, गंगूबाई यांचे सोशल मिडियावर एवढे गट का पडलेत? गेल्या वर्षी काहीच पाहाता येत नव्हतं. आता येतंय तर पहा मजेत सगळेच किंवा कोणतेही.”

महत्त्वाच्या बातम्या
अचूकतेसाठी ओळखल्या जाणारा चाणक्यचा एक्झिट पोल आला समोर; पंजाब, युपीबाबत धक्कादायक अंदाज
दूधात फक्त ही गोष्ट मिसळा, ७० वर्षे राहाल तरूण; सुरूवातीलाच होतील आश्चर्यकारक फायदे
मनसेच्या बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम; राज ठाकरेंना म्हणाला,’…शेवटचा जय महाराष्ट्र’
गोव्यात भाजप काँग्रेसमध्ये जोरदार सामना; पहा कुणाला किती जागा मिळणार

इतर बाॅलीवुड मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now