Share

सलमान आणि अमिर खानचे चित्रपट बायकॉट करा; ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून लोकांची मागणी

द काश्मिर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र याच चित्रपटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. संपूर्ण देशभरात या चित्रपटाने एका नविन चर्चेला उधाण आणले आहे. चित्रपटगृहात देखील चित्रपटाविषयी भाषणे ऐकायला भेटत आहेत. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते की, चित्रपट संपल्यानंतर ही लोक चित्रपटगृहात तसेच बसून राहिले आहेत.

परंतु आता द काश्मिर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे असे प्रकार चित्रपटगृहात बघायला मिळत आहेत. प्रेक्षक चित्रपट संपला की त्या काळातील कश्मिर पंडितांचे दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. चित्रपटगृहात मोठ मोठ्याने घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. याचा परिणाम चित्रपट पाहिला गेलेल्या तरुणांवर आणि कुटुंबावर होताना दिसत आहे.

कश्मिर फाईल्स चित्रपट ज्या ज्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तेथील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये लोक चित्रपट संपला की काही काळानंतर आपल्यावर देखील अशी वेळ येईल असे सांगताना दिसत आहेत. तसेच हे लोक मोठ मोठ्याने स्क्रिनसमोर जाऊन भाषणे देखील देत आहेत.

परंतु असे करणे साफ चुकीचे आहे. चित्रपटपाहून प्रत्येक व्यक्ती आपले वेगळे मत तयार करत आहे. मात्र अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मते लादण्याचे काम सुरु आहे. इतकेच नव्हे तर, चित्रपट संपल्यानंतर लोकशाहीला नावे ठेवली जात आहेत. लोकशाहीची खुलेआम मस्करी करण्यात येत आहे.

या लोकशाहीला अंमलात आणण्यासाठी भारतातील कित्येक महान व्यक्तींनी आपली आहुती दिली आहे. आज याच लोकशाहीला फक्त एका चित्रपटामुळे चुकीचे ठरविण्यात येत आहे. काही व्हिडीओमध्ये तर चित्रपटगृहाच्या मालकांनाच चित्रपट लावल्याची कारणे विचारली जात आहेत. तसेच त्यांना अनेक नको ते प्रश्न विचारले जात आहेत.

यामुळे द काश्मिर फाईल्स चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करावा की नाही असा प्रश्न चित्रपटगृहांच्या मालकांना पडला आहे. सोशल मिडीयावर आणखीन एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात थेट अमिर खान, सलमान खान यांच्या चित्रपटांना बायकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीमुळे आपण हा विचार करु शकतो की, लोकांवर चित्रपटाचा किती परिणाम झाला आहे.

https://twitter.com/cjwerleman/status/1503559837845954561?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1503559837845954561%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.thelallantop.com%2Fbherant%2Fsocial-media-being-flooded-by-viral-videos-from-theatres-running-movie-the-kashmir-files%2F

द काश्मिर फाईल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामुळे एका नविन वादाला सुरुवात झाली आहे. पावनखिंड, झुंड चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. परंतु तरी देखील द काश्मिर फाईल्स चित्रपटाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

महत्वाच्या बातम्या
RTO पथकाच्या हलगर्जीपणामुळे अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू; लोकांनी पुर्ण पथकालाच चोपले
२०० किमीची रेंज, २ तासात फुलचार्ज; भारतात लाँच होणार १ लाखापेक्षा कमी किंमत असलेली इलेक्ट्रिक बाईक
पगार घेण्यासाठी गेली होती शाळेत, दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि.., काश्मिर फाईल्सनंतर गिरीजा टिक्कूची कहाणी चर्चेत
पगार घेण्यासाठी गेली होती शाळेत, दहशतवाद्यांनी अपहरण केले आणि.., काश्मिर फाईल्सनंतर गिरीजा टिक्कूची कहाणी चर्चेत

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now