Share

‘बॉयकॉटमुळे फक्त आमिरचे नुकसान होत नसून, हजारो कुटुंबाचं नुकसान होतं’- विजय देवरकोंडा

आजकाल विजय देवरकोंडा त्याच्या आगामी ‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. विजय आपला चित्रपट हिट करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. बॉयकॉट बॉलीवूडच्या ट्रेंडमध्ये, विजय देवरकोंडाचा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

अशा परिस्थितीत, विजय देवरकोंडाने आता चित्रपटाला बॉयकॉट केलं जातं यावरून प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर खराब स्थितीत आहे हे तुम्हाला माहिती आहे. रिलीजपूर्वीच चित्रपटाच्या बॉयकॉट ट्रेंडमुळे लाल सिंग चड्ढा कमाईच्या बाबतीत संघर्ष करत आहे.

आता इंडिया टुडे शी संवाद साधताना साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाने बॉयकॉट ट्रेंडवर खुलेपणाने बोलले आहे. विजय देवरकोंडा म्हणाला, मला वाटते की चित्रपटाच्या सेटवर अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्याशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे लोक आहेत. एका चित्रपटात २००-३०० कलाकार काम करतात.

त्यात आमच्या सगळ्यांचे स्टाफ मेंबर्स पण असतात, त्यामुळे एक चित्रपट अनेकांना रोजगार देतो. बऱ्याच लोकांसाठी ते जगण्याचे एक साधन आहे. तसेच म्हणाला, जेव्हा आमिर खान सरांनी लाल सिंह चड्ढा बनवला तेव्हा त्यांचे नाव चित्रपटातील स्टार म्हणून पुढे आले होते, परंतु २ ते ३ हजार कुटुंबे याच्याशी जोडलेली असतात हे विसरता कामा नाही.

जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेता तेव्हा त्याचा केवळ आमिर खानवरच परिणाम होत नाही, तर हजारो लोकांवरही परिणाम होतो, त्यांची रोजीरोटी हिसकावून घेतली जाते याचाही विचार करावा लागतो. आमिर सर एक अशी व्यक्ती आहे जी लोकांना थिएटरमध्ये खेचते.

तसेच म्हणाला, हा बहिष्कार का होत आहे हे मला माहीत नाही. पण याला जे काही गैरसमज कारणीभूत आहेत, ते समजून घ्या की तुमचा एकट्या आमिर खानवर परिणाम होत नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे, हे मोठ्या प्रमाणावर घडत आहे.

बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now