Share

दोन्ही हात पुर्ण भाजले पण तरीही आगीत घुसून अनेकांचे जीव वाचवले; महीलेच्या शौर्याने सारेच भारावले

पश्चिम दिल्लीमध्ये भीषण आगीची घटना समोर आली आहे. मुंडका मेट्रो स्टेशनजवळच्या एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत 27 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी आपल्या जीवाची बाजी लावत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या एका महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिल्लीतील मुंडका परिसरातील व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 27 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. सर्व मृतदेह बाहेर काढले आहेत. तर 100 हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

अग्निशमन दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अजूनही 30 ते 40 नागरिक इमारतीत अडकल्याची शक्यता आहे. बचावकार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे. बचावकार्यासाठी साधारण 100 कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. अग्निशमन दलाच्या पथकाकडून अद्याप तिसऱ्या मजल्यावर सर्च ऑपरेशन सुरू आहे.

आग लागल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला होता. प्राण वाचवण्यासाठी लोकं धावत होते. काही लोक केवळ स्वतः चेच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांचे देखील प्राण वाचवण्यासाठी धडपडत होते. यात इथल्याच कारखान्यात काम करणाऱ्या एका महिलेने दाखवलेल्या शौर्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

ही महिला आपल्या जीवाची बाजी लावत इतरांचे प्राण वाचवण्यासाठी धावत होती. या महिलेचे नाव ऋचा रावत असून ती दोन मुलांची आई आहे. ती दीड वर्षांपासून इथल्या कारखान्यात काम करत होती. माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ती तिसऱ्या मजल्यावर होती.

आगीची माहिती मिळताच लोकांनी खिडकीला लावलेल्या खांबावरून खाली जाण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे दोर मध्येच तुटला. तेव्हा ऋचाने लोकांना तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरण्यास मदत केली. दरम्यान, तिचे दोन्ही हात भाजले. पण तिने तरीही सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिच्या या शौऱ्याचा अनेकांनी गौरव केला. सध्या तिची प्रकृती चांगली असल्याचे बोलले जात आहे. संबंधित कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगीच्या या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now