Share

कोविड लसीच्या बूस्टर डोसमुळे हार्टॲटॅकच्या घटनांमध्ये झाली वाढ? अखेर समोर आले सत्य

भारतात अलीकडे हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये वाढ झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्यांनी लोक चिंतेत पडले आहेत. दरम्यान, ही बातमी देखील पसरवली जात आहे की हृदयाचे ठोके बंद होण्याचे कारण म्हणजे कोरोनाचा बूस्टर डोस.

अनेकांना हजारो मेसेज येत आहेत ज्यात असे लिहिले आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच IMA ने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे कारण कोरोनाचा बूस्टर डोस असल्याचे सांगितले आहे. TOI ने नोंदवले की बूस्टर डोसचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूशी काहीही संबंध नाही.

त्यांनी पुढे माहिती दिली की TOI च्या संपादकीय टीमला असे 1.11 लाख मेसेज मिळाले ज्यात अर्धे बनावट असल्याचे आढळले. यामध्ये कोरोनाच्या बूस्टर डोसमुळे हृदयविकाराच्या झटक्यांशिवाय अनेक फेक न्यूजचाही समावेश करण्यात आला होता.

कोरोनाच्या बूस्टर डोसमुळे हृदयविकाराच्या खोट्या बातम्यांशिवाय अशा बातम्याही आहेत ज्या तपासात खोट्या असल्याचे आढळून आले आहे. फेक न्यूजच्या यादीत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसाबाबतही एक बातमी आहे. त्यात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्राने एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबरला आहे. त्याच वेळी, ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांना चाइल्ड पोर्नोग्राफीचा प्रचार केल्याबद्दल अटक झाल्याची खोटी बातमीही मोठ्या प्रमाणावर पसरली होती.

याशिवाय फुटबॉल दिग्गज रोनाल्डोबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या की, त्याने सौदी अरेबियातील आपल्या जोडीदारासोबत एकाच हॉटेलमध्ये राहण्यास नकार दिला होता. क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, आणखी एक बातमी सर्वत्र चर्चेत होती की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला ऋषभ पंतला रक्तदान केल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले.

महत्वाच्या बातम्या
हेल्मेटशिवाय चालवत होता बुलेट, पण पठ्याने असा जुगाड केला की पकडूनही पोलिस दंड करू शकले नाहीत
‘पंचांनी स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन सांगावं की त्यांचा निर्णय खरा होता’; सिंकदरच्या वडीलांची मागणी
रितेश भाऊचा नादच खुळा…! ‘वेड’ने १६ व्या दिवशी रचला इतिहास; केला ‘हा’ अनोखा विक्रम

आरोग्य इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now