Jasprit Bumrah: टीम इंडियाचा (Team India) स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे आणि तो ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतही खेळत नाहीये. Jasprit Bumrah, Team India, Bowler, Chetan Sharma
T20 विश्वचषक 2022 स्पर्धेत टीम इंडियाला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे. क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी मोठी बातमी दिली आहे. मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी सांगितले की, हा दिग्गज टीम इंडियामध्ये फिट झाल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन करत आहे.
मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी खुलासा केला आहे की, जसप्रीत बुमराह पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च 2023 मध्ये भारतीय भूमीवर खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी परतणार आहे. चेतन शर्मा म्हणाले, ‘जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग असेल.’
चेतन शर्मा म्हणाले, ‘जस्प्रीत बुमराहसोबत आम्हाला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. T20 विश्वचषक 2022 पूर्वी आम्ही जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची घाई केली आणि त्याचा परिणाम काय झाला ते तुम्ही पाहातच आहात, त्यामुळे आता धीर धरायचा आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहला परत आणण्याची आम्हाला घाई नाही. आम्ही सतर्क आहोत आणि NCA मेडिकल टीम बुमराहची चांगली काळजी घेत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.
ऑगस्टमध्ये बुमराहला पाठीला दुखापत झाल्याचे निदान झाले होते. यानंतर तो आशिया कपमधून बाहेर पडला. मात्र, सप्टेंबरमध्ये त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आले आणि टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला. हाच संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेतही उतरला होता.
बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने खेळले पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने पाठदुखीची तक्रार केली आणि या मालिकेतून आणि त्यानंतर टी-20 विश्वचषकातून तो बाहेर पडला. तेव्हापासून, बुमराह त्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएमध्ये आहे आणि कठोर रिहॅब प्रोग्राममधून जात आहे. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये तीन वनडेसह तितक्याच टी-20 सामने खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
Jasprit Bumrah: दुखापतग्रस्त बुमराहचे पाच वर्षांपुर्वीचे ट्विट पुन्हा व्हायरल, कमबॅकबद्दल केले होते मोठे वक्तव्य
Sourav Ganguly: अजूनही वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसू शकतो जसप्रीत बुमराह, सौरव गांगुलीने सांगितले समिकरण
Team India: टिम इंडियाचं सर्वात मोठं टेंशन मिटलं, बुमराहची उणीव भरून काढणार ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज