Share

तरूणीसोबत कॅफेमध्ये अश्लील चाळे, कंपार्टमेंट खोली बुक केली अन्…; भयंकर घटनेने जालन्यात खळबळ

जालन्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोहेला याने तरुणीला वारंवार फोन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर कॅफे शॉपमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

या तरुणाने कंपार्टमेंट खोली घेऊन बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. यामुळे तरुणीला गर्भधारणा झाली. यामुळे तरुणी खूपच घाबरली. यानंतर तिने सोहेलला सांगितल्यावर सोहेलने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या.

गोळ्या खाऊन देखील गर्भपात झाला नाही. नंतर त्याने पुन्हा गोळ्या आणून दिल्या. मात्र पुन्हा पण गर्भपात झाला नाही. नंतर मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिची प्रकृती बिघडली. यामुळे तरुण घाबरला. यामुळे त्याने तिला रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवले.

त्यांनतर सोहेलने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले व तिथून तो पळून गेला. नंतर घाबरलेल्या तरुणीने आपल्या आई- वडिलांना फोन करून रुग्णालयात बोलावून घेतले. तसेच त्यांना ही घटना सांगितली. यामुळे त्यांना धक्काच बसला.

नंतर तरुणीवर उपचार केल्यानंतर तिची प्रकृती सुधारल्यानंतर तिने बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपी सोहेल पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या तरुणीची परिस्थिती चांगली आहे. या घटनेमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पुढील तपास पिंक मोबाईल पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक इंगेवाड करीत आहेत. दरम्यान, १९ वर्षीय तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन कोचिंग क्लासमध्ये अकाउंटंट म्हणून काम करते. या तरुणीचे वडील बांधकाम व्यवसायिकांना मजूर पुरवठा करण्याचे काम करतात.

क्राईम

Join WhatsApp

Join Now