बोनी कपूर यांनी शबाना आझमीसोबत केला डान्स; व्हिडिओ पाहून जान्हवी म्हणाली, पापा….

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बोनी कपूर शबाना आझमीसोबत डान्स करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओद्वारे बोनी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (boney kapoor pays tribute to shammi kapoor)  यावर अनेक चाहत्यांसोबत सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. तर बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरनेही या व्हिडिओवर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

बोनी कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, बोनी कपूर अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत जंगली चित्रपटातील ‘मेरे यार शब्बा खैर’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत. तसेच व्हिडिओत दिसत आहे की, १९६० च्या दशकातील थीमवर आधारित ही पार्टी ठेवण्यात आली आहे.

व्हिडिओ शेअर करत बोनी कपूर यांनी लिहिले की, ‘शम्मी कपूर यांना माझी श्रद्धांजली. मी माझ्या वतीने पूर्ण प्रयत्न केला. तसेच पार्टीत मला ६०/७० च्या सर्वात जवळील क्लोन/ड्रेस स्टार म्हणून सन्मानित करण्यात आले आणि ट्रॉफीसुद्धा देण्यात आली’. बोनी कपूर यांच्या या व्हिडिओला चाहते खूप पसंती देत आहेत. तसेच त्यावर अनेक कमेंट करत आहेत.

बोनी कपूर यांच्या या व्हिडिओवर त्यांची मुलगी जान्हवी कपूरनेही कमेंट करत पापा असे लिहिले. तसेच यासोबत तिने अनेक हार्टच्या इमोजीसुद्धा पोस्ट केले आहेत. यासोबत इतर अनेक सेलिब्रिटीही कमेंट करत बोनी कपूर यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, बोनी कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. याद्वारे ते अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहतात. यामध्ये ते पत्नी श्रीदेवीच्या आठवणीत अनेक पोस्ट शेअर करत असतात. तसेच अनेकदा त्यांच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्ट्सना चाहत्यांचीही खूप पसंती मिळत असते.

नुकतीच बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. हा फोटो लखनऊमधील एका उत्सवातील दुर्गा दुर्गा पूजादरम्यानचा आहे. यावेळी श्रीदेवी सिंदूर खेळात सहभागी झाल्या होत्या. हा फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या :
सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी माधुरी खाते ‘हे’ खास प्रकारचे सॅलड, वाचा त्याचे आरोग्यदायी फायदे
Bigg boss: तेजस्वीच्या ‘या’ भूमिकेने जिंकली चाहत्यांची मने, म्हणाले, ‘हाच दृष्टीकोण कायम ठेव’
बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली आहेत ४ लग्न, चौथी पत्नी तर होती २९ वर्षांनी लहान