Share

बॉलिवूडचा ‘हा’ ऍक्शन हिरो आहे शाहरूख खानची प्रेरणा, म्हणाला, ‘मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल’

बॉलिवूडमध्ये ३० वर्षे पूर्ण करणारा आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांसाठी खूप चर्चेत आहे. दरम्यान, त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामधील त्याचा लूक पाहून चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. यासोबतच या खास प्रसंगी शाहरुख पहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांसाठी इंस्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये आला, जिथे त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. एवढेच नाही तर त्याने सलमान खानबद्दलही बोलले.(Shahrukh Khan, Pathan, Instagram Live Session, Salman Khan)

शाहरुखने सांगितले की, ‘सलमान आणि तो भाऊ आहेत, पण दोघांमध्ये मोठा कोण आहे हे त्यांना माहीत नाही’. याशिवाय शाहरुखने त्याच्या आवडत्या हिरोबद्दलही सांगितले आणि ‘हा अॅक्शन हिरो माझी प्रेरणा आहे’ असे सांगितले. एवढेच नाही तर शाहरुखने त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

टायगर श्रॉफने इंस्टाग्रामवर लाईव्ह सत्रादरम्यान कमेंटही केली, ज्यानंतर शाहरुख खूप खूश झाला आणि तो म्हणाला, ‘माझा मित्र टायगर श्रॉफ फक्त माझा मित्र नाही तर माझ्या मुलासारखा आहे. कारण तो दादाचा मुलगा आहे. शाहरुख पुढे म्हणतो की, ‘ऑनलाइन आल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल धन्यवाद’. यासोबतच शाहरुखने टायगर श्रॉफचेही खूप कौतुक केले.

शाहरुख म्हणाला की, ‘मी तुला वॉर चित्रपटात अॅक्शन करताना पाहिले आहे, जे मला खूप आवडले आणि त्यातूनच मला अॅक्शन आणि असे चित्रपट करण्याची प्रेरणा मिळाली. मी पण एक्शन करणार आहे, मात्र जी तुझ्यासारखी चांगली नसेल. तसेच माझे मसल्स तुमच्यासारखे शार्प नाहीत, पण मी प्रयत्न करत आहे. तू माझी प्रेरणा आहेस आणि इंशाअल्लाह मला तुझ्यासोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळेल.

शाहरुख २०१८ साली ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता, त्यानंतर आता तो अनेक चित्रपटांसह मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. यासोबतच त्याचे चाहते देखील त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्या चित्रपटाबद्दल खूप आनंदी आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारी २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘जवान’, ‘डंकी’ आणि ‘डॉन ३’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे, ज्यासाठी तो सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

महत्वाच्या बातम्या-
मी Gay….; शाहरुख खानचा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा
अभिनेता शाहरुख खान अंत्यदर्शनावेळी लता मंगेशकर यांच्यावर थुकला? काय आहे नेमकं सत्य जाणून घ्या
मी जुही, काजोल, उर्मिला, शिल्पासोबत बेडवर शाहरुख खानने केला धक्कादायक खुलासा
मी गे नाही, त्यामुळे मी कोणत्याही मुलीसोबत झोपेन शाहरुख खानने केला होता मोठा खुलासा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now