बॉलीवूडची सुपर ग्लॅमरस अभिनेत्री जीचं सौंदर्य वयाच्या तिशीनंतर सुद्धा टिकून आहे ती म्हणजे करीना कपूर. आज पण चाहत्यांच्या मनावर ती राज्य करत आहे. करीना कायम तिच्या फिटनेस, लुक्स आणि नव्या प्रोजेक्टसाठी चर्चेत असते. परंतु आता वेगळ्याच कारणासाठी ती चर्चेत आली आहे. (Bollywood’s Bebo will become a mother for the third time)
करीना कपूर आपल्या कुटुंबीयांसमवेत सध्या लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. त्या ठिकाणाहून काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये करीनाचे बेबी बंप दिसत आहे. ज्यावरून करीना पुन्हा एकदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
करीना कपूरला तैमूर आणि जेह अशी दोन मुले आहेत. करीनाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की, नवरा सैफ अली खान त्याच्या वयाच्या प्रत्येक दहा वर्षात बाप बनला आहे. म्हणजे तो वीस वर्षाचा असताना एका मुलाचा बाप होता. त्यानंतर तीस मग चाळीस आता साठमध्ये मी त्याला बाप बनू देणार नाही, असे तिने म्हटलं होतं.
परंतु सध्या करिनाचे जे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामधून तर तिचा विचार बदललेला दिसतोय, असेच म्हणायला हवे. लंडनमध्ये सुट्टीला गेलेल्या करीनासोबत त्या ठिकाणी करिष्मा कपूर, अमृता अरोरा यादेखील आहेत.
लंडनमध्ये एका व्यक्तीसोबत काढलेला फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये सैफ अली खान पण तिच्या सोबत आहे. या फोटोमध्ये ती पोट लपवताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या तिसऱ्या बाळाच्या जन्माची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.
करीना कपूरच्या फोटोमध्ये तिचे वाढलेले फोटो पाहून करीना कपूर पुन्हा एकदा आई होण्याच्या तयारीत आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या फोटोची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या-
शिंदे सरकराचा अजितदादांना जोरदार धक्का; तब्बल ९४१ कोटी रूपये रोखले
सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे भेटणार; शिवसेना नेत्याच्या टि्वटमुळे खळबळ
VIDEO: चिमुकलीने जवानाच्या पायांना केला स्पर्श, जवानानेही केलं असं काही की.., पाहून भावूक व्हाल