Share

नुपूर शर्माला सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बॉलीवूड दिग्दर्शक संतापला; म्हणाला, लाज वाटेल अशी…

गेल्या काही दिवसांपासून नुपूर शर्मा प्रकरण चर्चेत आहे. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांना सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं आहे. यावर आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आहे, मात्र ट्विट मध्ये त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही.

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्माला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यांच्यामुळेच उदयपूरमध्ये एवढी मोठी घटना घडल्याचेही बोलले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नुपूरने तिची केस दिल्लीला हलवण्याचे आवाहन केले होते.

मात्र, सुप्रिम कोर्टानं ज्या शब्दात नुपूर शर्मांना फटकारलं ते चर्चेत आल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘पीडितांना लज्जास्पद वागणूक देणं हे आता कायदेशीर झालं आहे’. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटचा संबंध नेटकरी थेट नपूर शर्मा केसशी लावत आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे, ‘सुप्रीम कोर्टला केवळ नुपूर शर्मांना नाही, तर या प्रकरणाचा आणखी भडका उडवू पाहत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या समोरच्या लोकांना देखील फटकारायला हवं. कारण वाईट शब्द तर समोरुन देखील नुपूर शर्मांना बोलले गेले आहेत. न्याय एकाच बाजूने दिला जाऊ शकत नाही’.

तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,’असंच जर चालू राहिलं तर जगात हिंदूंचा देशच नसेल. हे असं व्हायला ५-१० वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार नाही’. विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटचे काही नेटकऱ्यांनी समर्थन करत प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/vivekagnihotri/status/1542770651693428736?t=ebm6tOYFHMY32S15SYbUUQ&s=19

तसेच, गीतकार मनोज मुंतशीर यांनी देखील या प्रकरणा संदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, ‘सुप्रीम कोर्टाच्या या अशा वक्तव्यानंतर नुपूर शर्मा यांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो’ त्याचं हे ट्विट देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने पैगंबर मोहम्मद यांच्यावर वक्तव्य केल्या संदर्भात नुपूर शर्मा यांना फटकारलं आहे. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण बिघडलं. पूर्ण वाद हा टी.व्ही वरील त्या चर्चात्मक कार्यक्रमामुळे वाढला, त्यामुळे नुपूर शर्मा यांना टी.व्ही वरच पूर्ण देशाची माफी मागायला हवी असे कोर्टाने आदेश दिले आहेत.

इतर राजकारण

Join WhatsApp

Join Now