Share

लतादीदींच्या निधनानंतर बाॅलिवूड शोकसागरात; अनिल कपूर म्हणाले काळीज तुटलं..

Bollywood Celebrities

भारताच्या गानसम्राज्ञी, गान सरस्वती, स्वर कोकीला, मेलोडी क्वीन अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असणाऱ्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. तर उपचारादरम्यान आज रविवारी (६ डिसेंबर) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी (Bollywood Celebrities )त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारने लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, ‘मेरी आवाज ही पहचान हैं, गर याद रहे…’ आणि असा आवाज कसा विसरता येईल! लता मंगेशकर यांच्या निधनाने खूप दु:ख झाले आहे. माझ्या मनापासून संवेदना आणि प्रार्थना. ओम शांती’.

अभिनेता बोमन इराणी यांनी लता मंगेशकरांच्या निधनावर ट्विट करत लिहिले की, ‘त्या एका देवदूतासारख्या वाटत होत्या आणि आता त्या खरंच झाल्या आहेत. लता दीदी यांच्या आत्म्यास शांती लाभो’.

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी यांनीही लता मंगेशकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘आशेविरुद्ध एक आशा आहे की हे खरं नाही. आणि जर हे खरं असेल तर… ही हानी आणि दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. लता मंगेशकर यांचा आवाजच भारताची ओळख आहे आणि कायम राहणार’.

पुढे त्यांनी लिहिले की, ‘मागील इंडियन आयडॉलच्या सीझनच्या वेळी त्यांनी मला फोन केला होता. संगीताबद्दल बोलताना त्या खूप आनंदी आणि उत्साहित होत्या. त्यांच्याशी साधलेला तो संवाद आठवून आज मी पूर्णपणे तुटलो आहे. लता मंगेशकर यांनी मला आणि भारतातील प्रत्येक संगीतकाराला शिकवले आहे. आणि मला त्यांचे वैयक्तिक आभार मानावे लागले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे’.

https://twitter.com/VishalDadlani/status/1490183234419892224?s=20&t=Dn1WReT61f11oosBgQyX_A

शंकर महादेवन यांनी लिहिले की, ‘लता मंगेशकर कायम राहतील, तुमचे आशीर्वाद असूद्या दीदी’.

https://twitter.com/Shankar_Live/status/1490179284471713798?s=20&t=Dn1WReT61f11oosBgQyX_A

श्रेया घोषालने लता मंगेशकर यांचा एक फोटो ट्विट करत लिहिले की, ‘खूपच सुन्न आणि उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. काल सरस्वती पूजन होते आणि देवीने तिचा आर्शीवाद तिच्यासोबत नेला. असं वाटत आहे की, आज पक्षी, झाडं आणि वाराही शांत आहे. स्वरकोकीळा भारतरत्न लता मंगेशकरजी तुमचा आवाज अनंतकाळापर्यंत गुंजर राहील. तुमच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती’.

https://twitter.com/shreyaghoshal/status/1490207285435826176?s=20&t=Dn1WReT61f11oosBgQyX_A

अनिल कपूर यांनी लिहिले की, ‘काळीज तुटले. पण या अतुलनीय व्यक्तिमत्वाला जाणत असल्याबद्दल आणि प्रेम करत असल्याबद्दल धन्य आहे. लताजींनी आपल्या ह्रदयात एक स्थान निर्माण केले आहे. ती जागा इतर कोणीही घेऊ शकणार नाही. त्यांच्या संगीताने त्यांनी आपल्या आयुष्यावर खोलवर परिणाम केला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या तेजाने स्वर्गही उजळू दे’.

https://twitter.com/AnilKapoor/status/1490186079063863296?s=20&t=Dn1WReT61f11oosBgQyX_A

अनुपम खेर यांनी लिहिले की, ‘भारतरत्न लता मंगेशकर आपल्या मधून कुठेच जाऊ शकत नाहीत. त्यांचा प्रतिबिंब आणि त्यांचा आवाज भारतीयांच्या ह्रदयात आणि आत्म्यात कायम राहिल. पण वर देवीदेवतांनाही लतादीदींचा आवाज ऐकावा वाटला असेल. तसे मी तुमचा व्हॉट्सअॅप मेसेज खूप मिस करणार’.

https://twitter.com/AnupamPKher/status/1490200720167301124?s=20&t=Dn1WReT61f11oosBgQyX_A

सलमान खानने लिहिले की, ‘आम्ही तुम्हाला नेहमी मिस करणार आमच्या बुलबुल. पण तुमचा आवाज कायम आमच्यासोबत राहिल. तुमच्या आत्म्यास शांती लाभो लताजी’.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1490226548041207809?s=20&t=Dn1WReT61f11oosBgQyX_A

 

महत्त्वाच्या बातम्या :
एकदा लता मंगेशकर यांना एका व्यक्तीने दिले होते विष, मरता मरता वाचल्या होत्या दीदी, वाचा किस्सा
‘बाळासाहेबांनंतर लतादीदीच आमचा आधार, त्यांच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झालाय’
लता मंगेशकरांना आई मानत असे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर; किस्सा वाचून डोळ्यात पाणी येईल

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now