Share

‘मी त्याला फोन लावला आणि त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं’, अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ

Isha Koppikar About Casting Couch

ग्लॅमरच्या दुनियेत आपली ओळख निर्माण करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. परंतु यामध्ये काहींच्या वाट्याला यश मिळते तर काहींच्या वाट्याला अपयश. पण हे यश सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खूप संघर्ष करावे लागते. वाटेत येणाऱ्या संकटांना, आव्हानांना जो सामोरे जातो तो तेथे टिकून राहतो. आणि जो या सर्वांपासून दूर जातो तो आयुष्य जगत असतो. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पिकरने (Isha Koppikar About Casting Couch) सिनेसृष्टीतील संघर्षाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

नुकतीच ईशाने बॉम्बे टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ईशाने बॉलिवूडमधील गटवाद (नेपोटिज्म) आणि कास्टिंग काऊचबाबत खुलासा केला आहे. तिने म्हटले की, मी एक मुर्ख मुलगी आहे त्यामुळेच मी अनेक प्रोजेक्टस माझ्या हातातून घालवले. एक गुंड प्रवृत्तीची अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत माझ्याबद्दल गैरसमज आहे. पण मी इथे काम करण्यासाठी आले. जर तुम्ही मला आवडत असाल तरच मी तुमच्याशी बोलेन. पण जर तुम्ही माझ्यासोबत वाद घातलात तर तुम्हाला शुभेच्छा, असा माझा अॅट्यीट्यूड आहे.

ईशाने पुढे सांगितले की, या अॅट्यिट्यूडचा नादात मी अनेक चित्रपट गमावले. पण याचा मला कोणताच पश्चात्ताप नाही. कारण कोणीही तुम्हाला काहीही करण्यासाठी सक्ती करू शकत नाही. शेवटी ती माझी इच्छा आहे की, मी चित्रपट करू इच्छित आहे की नाही.

यावेळी ईशाने कास्टिंग काऊचबाबत बोलताना सांगितले की, इथे काही ग्रूप्स आहेत आणि इथेही नेपोटिज्म चालतो. २००० साली मला एका प्रसिद्ध निर्मात्याने बोलावले होते. त्यावेळी त्याने मला म्हटले होते की, तुला हिरोच्या नजरेत चांगले असायला हवे. त्यावेळी दिग्दर्शकाला काय म्हणायचे होते ते मला कळले नाही. त्यामुळे मी अभिनेत्याला फोन लावला. त्याने मला एकटीला भेटण्यास बोलावले.

ईशाने म्हटले की, ‘त्यावेळी त्या अभिनेत्यावर काही आरोपही करण्यात येत होते. त्यामुळे त्याने मला एकटीला भेटण्यास यायला सांगितले होते. पण त्यानंतर मी निर्मात्याला फोन केला आणि म्हटले की, इथपर्यंत मी माझ्या प्रतिभेमुळे आणि माझ्या लूकमुळे आली आहे. आणि जर त्याद्वारे मला चांगले काम मिळाले तर बरं होईल. माझ्या या वक्तव्याचा काही उपयोग तर झाला नाही पण उलट याचा माझ्या कामावर परिणाम झाला. त्यानंतर मला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले’.

ईशा कोप्पिकरने १९९८ साली ‘एक था दिल’, ‘एक थी धडकन’ नावाच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘काँटे’, ‘दिल का रिश्ता’, ‘डॉन’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘क्या कूल है हम’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. बॉलिवूडमध्ये ती आयटम सॉन्गसाठी ओळखले जाते. हिंदीसोबत तिने मराठी, कन्नड, तेलुगू या भाषेतील चित्रपटातही काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांच्या अपघाताचे खरे कारण आले समोर, वाचा नेमकं काय घडलं..
‘तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस’; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावूक पोस्ट
प्रेयसीच्या छळाला वैतागून प्रियकराने तिच्याच घरात संपवले जीवन; नंतर प्रेयसीने जे केले ते वाचून धक्का बसेल

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now