‘बाबा निराला’च्या भूमिकेतून अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) धुमाकूळ घातली होती. त्याच्या ‘आश्रम’ (Ashram) या वेब सिरीजचे दोन सीझन चाहत्यांनी खूप एन्जॉय केले आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते त्याच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
‘आश्रम 3’ या लोकप्रिय वेब सिरीजचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यासोबतच ‘आश्रम 3’ च्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. MX Player ने ‘आश्रम 3’ चा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे त्यासोबतच ‘आश्रम 3’ च्या ट्रेलर रिलीजच्या तारखेबद्दलही सांगितले. बॉबी देओलची सुपरहिट सीरीज ‘आश्रम 3’ चा ट्रेलर आज म्हणजे १३ मे २०२२ रोजी रिलीज झाला आहे.
निर्माते बाबा निराला यांच्या नवीन अभिनयासाठी आणि स्फोटक ट्विस्टसाठी सज्ज आहेत. २०२० मध्ये आश्रम सिरीजची जर्नी सुरू झाली. या व्हिडीओमध्ये बॉबी देओल सांगतो की, या मालिकेला इतकं प्रेम मिळेल असा विचारही केला नव्हता. चाहत्यांची जी प्रतिक्रिया होती ती खूपच अप्रतिम होती. त्याचबरोबर प्रकाश झा यांनीही या सिरीजला मिळालेल्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
अभिनेत्री ईशा गुप्तानेही व्हिडिओ शेअर केला आहे. प्रमोशन पोस्टरही एक दिवस आधी रिलीज करण्यात आले होते. ‘गंगाजल’, ‘राजनीती’ आणि ‘सत्याग्रह’ सारखे चित्रपट करणारे सुपरहिट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी या ‘आश्रम’ सीरीजचे दिग्दर्शन केले आहे. या सीरीजने बॉबी देओलच्या ओटीटी करिअरलाही उंचीवर नेले आहे.
‘आश्रम’ सीरीजमध्ये बॉबी देओलशिवाय ‘भूपा स्वामी’च्या भूमिकेत चंदन रॉय, ‘पोलीसवाले’च्या भूमिकेत दर्शन कुमार, ‘बबिता’च्या भूमिकेत त्रिधा चौधरी, ‘पम्मी’च्या भूमिकेत आदिती असे अनेक स्टार्स आहेत. सध्या निर्मात्यांनी ‘आश्रम 3’ च्या रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. अशी अपेक्षा आहे की निर्माते ट्रेलरसह त्याची रिलीजची तारीख जाहीर करतील. एमएक्स प्लेअरच्या या सीरीजबद्दल सध्या चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
..त्यामुळे अभिनय सोडून बॉबी देओलला करावे लागले नाईट क्लबमध्ये काम, कठीण काळात पत्नीने दिली साथ
ICU मध्ये असलेल्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत समोर आली ही मोठी माहिती, सनी देओल रुग्णालयात दाखल
वयाच्या ५७ व्या वर्षी सनी देओलने उडवून दिली होती खळबळ, ३८ वर्षांपेक्षा लहान अभिनेत्रीसोबत केले होते बोल्ड सिन्स
आश्रम मधील बबिताचा हॉट अवतार पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम, ह्रदयावर ताबा ठेवणे झाले अवघड