टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची गुंतवणूकदार असणारी ब्लूस्टोन ज्वेलर कंपनी लवकरच १५०० कोटी रूपयांचा आयपीओ आणणार आहे. ब्लूस्टोन आयपीओमार्फत १० ते १२ टक्के हिस्सेदारी विकणार आहे. मुख्य म्हणजे, कंपनीने यावर काम करण्यासाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज आणि जेएम फायनॅन्शिअलला इन्व्हेस्टमेंट बँकर नियुक्त केले आहेत.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी येत्या २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आपला आयपीओ आणू शकते. या आयपीओसाठी कंपनी पुढील महिन्यात सर्व कागदपत्रे सेबीकडे जमा करणार आहे. या आयपीओला ऑनलाइन मार्केटप्लेस Bluestone.com द्वारे ऑपरेट केले जाते.
कंपनीचे खाजगी इक्विटी इन्व्हेस्टर्स त्यांचे स्टेक याद्वारे विकू शकतात. यात कलारी कॅपिटलसह काही कंपन्या त्यांचा काही हिस्सा किंवा संपूर्ण हिस्साही यामध्ये विकू शकतात. सध्या कंपनीने याचे व्हॅल्युएशन ठरवलेले नाही. परंतु कंपनीचा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल अशा पध्दतीने असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लूस्टोनने आयपीओसाठी अगोदरच विचार केला होता. परंतु याच्या सर्व गोष्टी नियोजनबद्ध झाल्यानंतर कंपनीने याची माहिती समोर आणली आहे. अद्याप याच्यावर काम सुरु आहे. ब्लूस्टोन कंपनी जगातील सर्वात दिग्गज कंपण्यांपैकी एक आहे. या कंपनीकडे ८००० पेक्षा जास्त ज्वलेरी डिझाईन्स आहेत.
ब्लूस्टोनच्या बरोबरीला प्रतिस्पर्धी म्हणून टायटन आणि तनिष्क कंपनी आहे. त्याचे मार्केट कॅप २.१९ लाख कोटी रुपये आहे. कल्याण ज्वेलर्सचे मार्केट कॅप २०,७६७ कोटी रुपये तर पीसी ज्वेलर्सचे मार्केट कॅप ६,१२९ कोटी रुपये आहे. यात ब्लूस्टोनचे मुंबईत दोन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत.
आता ब्लूस्टोन चंदीगड, मुंबई आणि हैदराबादमध्ये ५ नवीन स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे. यापूर्वीच कंपनीने १५०० कोटी रूपयांचा आयपीओ आणणार असल्याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात मोठी दागिन्यांची बाजारपेठ भारतात आहे. या बाजारपेठेत ब्लूस्टोनचे नाव उंचावर आहे.
महत्वाच्या बातम्या
गोड बातमी! शिवतीर्थावर लवकरच हलणार पाळणा, राज ठाकरे होणार आजोबा
पुन्हा ‘कोरोना’चा हाहाकार; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा, पुन्हा लागणार लॉकडाऊन
मुलांनी म्हातारपणात सोडलं वाऱ्यावर, मग म्हाताऱ्यानेही इंगा दाखवत 3 कोटींची संपत्ती केली दान
‘मी त्याला फोन लावला आणि त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं’, अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ