Share

अंध भावोजीचा तीन अपंग मित्रांसह मेहुणीवर सामूहिक बलात्कार; ‘असे’ आले प्रकरण उघडकीस

crime

अलीकडे मोठ्या प्रमाणात धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस येत आहे. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे महिला सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल सध्या उपस्थित होतं आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

दोन अंधांसह चार अपंग व्यक्तींनी एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील कुर्ला येथे उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

वाचा नेमकं प्रकरण काय..? ही घटना मुंबईमधील कुर्ला येथे घडल्याच उघडकीस आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन अंधांसह चार अपंग व्यक्तींनी एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात सदर पीडिता कुर्ला येथे तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी रात्री तिची बहिण कामानिमित्त बाहेर गेलेली असताना तिच्या सोबत हे भयानक कृत्य घडलं. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या भावोजींनी व त्याच्या तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

ते चौघंही दारूच्या नशेत असल्याची माहिती आता तपासादरम्यान समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत कुणालाही सांगितल्यास तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तुम्हाला वाचून धक्का बसेल मात्र, तब्बल तीन महिने त्या नराधमांनी पीडित महिलेवर अत्याचार केले.

दरम्यान, अखेर सर्व प्रकार उघडकीस आला. अन् सर्वांच जबर धक्का बसला. मंगळवारी त्या तरुणीने गोवंडीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चारही जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सुशांत प्रकरणातील आदित्य ठाकरेंच्या भूमिकेबद्दल प्रेयसी रिया चक्रवर्तीने केले होते ‘हे’ खुलासे
मुलाच्या आठवनीत व्याकूळ झाल्या निवेदिता सराफ; म्हणाल्या, आईसाठी सर्वात अवघड काय असेल तर…
धक्कादायक! लग्नात बेभान होऊन नाचता नाचता झाला मृत्यू; पाहा व्हायरल व्हिडीओ
ना साडी ना श्रृंगार..! कर्तव्याचं लेणं घेऊन महिला पोलिसांचे ‘ऑनड्यूटी’ वटसावित्री पूजन; जाणून घ्या त्यांच्या भावना…

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now