Share

आंधळं प्रेम! तरुणीने भावासोबतच लग्न करण्याचा धरला हट्ट, नंतर व्हिडीओ बनवला आणि..

प्रेमात माणूस आंधळं होतं आणि काहीही करण्यास तयार असतं असं म्हणतात. अशीच एक घटना समोर आली आहे. विधवा बहिणीला तिच्याच मावस भावावर प्रेम आलं. दोघांची जवळीक झाली, आणि लग्न करणार तर भावाशीच असा हट्ट तिने धरला. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात चर्चेला उधाण आले.

हे प्रकरण बिहारच्या पश्चिमी पंचारण जिल्ह्यात बानूछापर येथील आहे. विधवा तरुणीचं नाव चंदा असून, तिच्या पतीचा मृत्यू एक वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर ती एकटी पडली. एकटेपणात ती आपल्या मावस भावाच्या जवळ आली. त्याच्यावर तिचं प्रेम जडलं. त्याच्यासोबत लग्न करण्याचा तिनं हट्ट धरला.

तिच्या मावसभावाचं नाव सुनील कुमार आहे. त्याला देखील तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांच्या प्रेमाबद्दल कुटूंबियांना कळताच त्यांनी दोघांना विरोध केला. शेजारी समजल्यानंतर त्यांनी पंचायत बोलावली.

पंचायती समोर देखील तरुणीनं लग्न करणार तर सुनील सोबतच करणार असा हट्टच धरला. त्यानंतर पंचायती ने त्यांना शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. तरुणीनं याविरोधात एक व्हिडीओ बनवून त्यांच्या लग्नासाठी मदत मागितली आहे. व्हिडीओ बद्दल बानुछापर पोलिसांना समजताच त्यांनी याची दखल घेतली.

पोलिसांनी पंचायतीला आणि कुटूंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून सांगितले की, हे दोघेही प्रौढ आहेत, त्यांना जो त्रास देईल त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल. दोघांना लग्न करायचे आहे तर त्यासाठी कोणी अडवू शकत नाही. असं पोलिसांनी सांगितलं.

आजही अनेक ठिकाणी प्रौढ तरुणांना त्यांच्या इच्छेने समाज लग्न करू देत नाही. तरुण तरुणीने पळून जाऊन लग्न केलं तर, त्यांना गाठून त्यांची हत्या केली जाते. बुरसटलेल्या विचारांचे आजही समाजात लोक आहेत. त्यांचे विचार बदलणे ही काळाची गरज आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now