udhav thackeray : सत्तांतरानंतरचा येणारा पहिलाच दसरा मेळावा चांगलाच चर्चेत आला आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने आता शिवाजीपार्कवर नेमका कोणाचा मेळावा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा शिवाजीपार्कवर मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटात चढाओढ सुरू आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या काही आमदारांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’चे मैदान मिळावे, यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी अर्ज केला होता. महत्त्वाची बाब म्हणजे तो ‘MMRDA’ने स्वीकारला असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र शिवसेनेने म्हणजेच ठाकरे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचं म्हटलं आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या बैठकीत उद्धव यांनी आपला शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी तातडीने कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांना बैठकीत दिल्या आहेत. याचबरोबर महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.
Chandrakant Khaire : “आम्ही क्रांती केली म्हणून खैरेंना महत्व आले, यापूर्वी त्यांना मातोश्रीवर प्रवेशही मिळत नव्हता “
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार