Share

शिवसेनेच्या पवारांना आस्मान दाखवण्याची भाजपची तयारी; फडणवीसांनी सांगीतला पुर्ण प्लॅन

राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळते आहे. महाविकास आघाडी आणि भाजप एक एक मतासाठी प्रत्येक आमदाराच्या कनेक्टमध्ये आहे. अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच राज्यसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

देवेंद्र फडणवीस यांनी काल ऑनलाइन बैठक घेतली. ही बैठक भाजपचे निवडणूक प्रभारी अश्विनी वैष्णव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्यात झाली. या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची रणनिती ठरली.

भाजपच्या या बैठकीनंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, शिवसेनेच्या संजय पवार यांना आस्मान दाखविण्याची सगळी तयारी आमची झाली आहे. आजच्या बैठकीत त्याबद्दलची सगळी रणनीती ठरली आहे.

राज्यसभा निवडणूक आणि मतदानादरम्यान कोण-कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. तसेच म्हणाले, नियोजनानुसार आमचा तिसरा उमेदवार धनंजय महाडिक जिंकून येणारच, आम्ही संजय पवार यांना आस्मान दाखवू, असे आमदार आशिष शेलार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत मार्गदर्शन केले. राज्यसभा निवडणुकीचा सर्व आढावा, व्यवस्था, रणनीती आणि कार्यपद्धती याविषयीची ब्लू प्रिंट आमची तयार आहे. भाजपचा सहावा उमेदवार म्हणजे धनंजय महाडिक नक्की जिंकून येणार. शिवसेनेच्या संजय पवार यांचा या निवडणुकीत नक्की पराभव होणार असे आशिष शेलार म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये जी रणनीती आखली जात आहे, जे नियोजन केले जात आहे, ते येणाऱ्या निवडणुकीत यशस्वी होणार का पाहावं लागेल. दुसरीकडे शिवसेना आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी पुढे कोणती पाऊले उचलणार हे देखील पाहायला मिळणार आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now