BJP : नुकताच राज्यातील विविध ग्रामपंचायतींचा निकाल समोर आला आहे. रविवारी या ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यातच जळगाव जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल समोर आला आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी एकही ग्रामपंचायत भाजपच्या वाट्याला आली नाही. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
या निवडणुकीत शिंदे गट, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी तीन ग्रामपंचायती आल्या आहेत. तसेच उरलेल्या चार ग्रामपंचायती अपक्षांच्या पदरात पडल्या आहेत. भाजपच्या वाट्याला याठिकाणी अपयश आले आहे.
जळगावमध्ये भाजपसोबतच काँग्रेसलादेखील एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. त्यामुळे या दोन्ही गटांच्या पदरात अपयश आले आहे. मात्र, शिंदे गट, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्षांनी यावेळी बाजी मारली आहे.
जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत, सरपंच आणि त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे ;
१. वंदना ज्ञानेश्वर भादले – राष्ट्रवादी – सत्रासेन
२. जुनाबाई किसन पाडवी – शिवसेना – बोरमळी/देव्हारी
३. अंजुम रमजान तडवी – शिंदे गट – मोहरद
४. दत्तरसिंग सुभाष पावरा – शिंदे गट – वैजापूर
५. अलका सतीश बारेला – अपक्ष – कर्जाने
६. वकील शिवाजी इंगळे – शिंदे गट – पिंप्री
७. रिनेश रमेश पावरा – राष्ट्रवादी – उमर्टी
८. हरिश्चंद्र सोनसिंग भादले – राष्ट्रवादी – मोरचीडा
९. पिनबाई गेमा बारेला – शिवसेना – कृष्णापूर
१०. शकुंतला धरमसिंग बारेला – अपक्ष – बोरअजंटी
११. लालबाई प्रताप पावरा – अपक्ष – मेलाणे
१२. रमाबाई भारसिंग बारेला – शिवसेना – मालोद
१३. मीना राजू तडवी – अपक्ष – परसाळे बुद्रुक
जळगाव ग्रामपंचायत पक्षनिहाय निकाल ;
राष्ट्रवादी – ३
शिवसेना – ३
शिंदे गट – ३
अपक्ष -४
भाजप – ०
काँग्रेस – ०
महत्वाच्या बातम्या
Ambadas Danve : शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना पाडण्यासाठी दानवेंनी कट्टर शिवसैनिकांना दिला ‘हा’ कानमंत्र
Shivsena : “सरकारने परवानगी नाकारली तर थेट शिवतीर्थाच्या आतमध्ये घुसून दसरा मेळावा घेणार”; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
Ramdas Kadam : उद्धव ठाकरे मातोश्रीत लपून बसायचे आणि रश्मी कंत्राटदारांना…; रामदास कदमांचे सणसणाटी आरोप
Police : ‘यापुढे खाकी वर्दी घालून नाचल्यास खैर नाही’; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांना कठोर निर्देश