Share

शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट टाकणं भाजप पदाधिकाऱ्याला पडलं महागात; वाचा नेमकं काय घडलं

bjp

प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेबसूकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. केतकी चितळेच्या पोस्टवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय वर्तुळातही या प्रकरणावर वातावरण तापलेले आहे.

अनेक नेत्यांनी तिच्या पोस्टला विरोध केला आहे.  तिला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे केतकी चितळेवर शाई फेक करण्यात आली आहे. केतकी चितळेला कळंबोली पोलिस ठाण्यात केतकीला नेण्यात आले होते. त्याचवेळी ही धक्कादायक घटना घडली.

अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनीदेखील फेसबुकवर शरद पवारांवर टोकाची टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. यामुळे आता आणखीच राजकारण तापले आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय..? भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांनी फेसबुकवर शरद पवारांवर टोकाची टीका केली होती. याचाच बदला घेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहाण केली आहे. तसेच आंबेकर यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पवारांवर केलेल्या पोस्ट केल्याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते हे त्यांच्या कार्यालयात गेले होते. मात्र आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहाण केली. यावर अद्याप भाजप नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

तर दुसरीकडे या घडल्या प्रकाराबाबत विनायक आंबेकर यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची माफी देखील मागितली. ‘माझ्या कवितेत शेवटच्या दोन ओळई चुकीच्या लिहिल्या गेल्या. मात्र त्या मागे कोणताही वाईट हेतू नव्हता, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची माफी मागतो, असं त्यांनी म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
तुमच्या मालकांसह १७ पिढ्या खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील; उद्धव ठाकरे गरजले
‘केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद अन् उच्छादाचा कळस करतात, त्यांना ठेचायची वेळ आलीय’
शिवसेनेच्या विराट सभेतील ‘हा’ क्षण ठरला लक्षणीय; वाचा नेमकं काय घडलं…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now