BJP : शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे अमेठीनंतर आता बारामती हे भाजपचे लक्ष्य असेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवारांना आव्हान देण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठी हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी दोनदा प्रयत्न केल्यानंतर अखेर तिसऱ्यांदा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. आता हीच पद्धत भाजप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात वापरणार आहे.
याआधी २०१४ आणि २०१९ मध्येही भाजपने बारामती जिंकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे ते आता पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहेत. ही जबाबदारी आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपची रणनीती सांगितली आहे. यावेळी ते म्हणाले की, येत्या निवडणुकीत भाजपने ४५ जागा निवडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी राज्याचा दौरा करत आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ४५ हुन जास्त लोकसभा जागा आणि २०० पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा आम्ही शिंदे गट आणि भाजपच्या युतीच्या बळावर लढवू , असेही ते म्हणाले. राज्य पातळीवर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे बारामती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासाठी त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे यावर आता शरद पवार काय पावलं उचलतात हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच भाजपच्या या खेळीचा राष्ट्रवादीवर काही परिणाम होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
Politics: ती बाई पिक्चरमध्ये सिगारेट पिते, फोटो कसे काढले, कसे कपडे असतात; खैरेंनी नवनीत राणांची लाजच काढली
कॉंग्रेसला भलं मोठं भगदाड! अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार?, कॉंग्रेसच्या गोटात खळबळ
गुजरात नशेचे केंद्र, मुंद्रा बंदरातून अंमली पदार्थांची तस्करी, पण मोदी..; राहूल गांधींचे गंभीर आरोप
…तर मी राजीनामा देऊन टाकेन; तानाजी सावंत यांनी केलं जाहीर आव्हान, वाचा नेमकं काय म्हंटलंय?